Video : लग्नात वऱ्हाडींची जेवणाची इतकी भारी सोय, पाहून सगळेच हैराण झाले

लग्नात पाहुण्यांची उत्तम जेवणाची सोय झाली तर मग काय विचारायलाच नको. पण एका लग्नात पाहुण्यांची इतकी भारी सोय तुम्ही कधीच पाहिली नसेल.

Video : लग्नात वऱ्हाडींची जेवणाची इतकी भारी सोय, पाहून सगळेच हैराण झाले
| Updated on: Mar 11, 2023 | 11:39 PM

Viral Video : लग्न ही खास गोष्ट असते. आपलं लग्न खास बनवण्यासाठी सगळेच मेहनत घेत असतात. वेगवेगळ्या प्रकारे आता लग्नात उत्तम सोय केली जाते. जे पाहून पाहुण्यांना देखील मज्जा येते. ते देखील लग्न एन्जॉय करतात आणि लक्षात ठेवतात. आपल्या घरातील लग्न विस्मरणीय बनवण्यासाठी पाहुण्यांना सुंदर प्रकारे जेवणाची सोय केली गेली. त्यांना विशेष महत्त्व दिले गेले आणि आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहुण्यांसाठी अनोखी जेवण व्यवस्था

लग्नात पाहुण्यांसाठी जेवणाची इतकी शानदार व्यवस् होती की प्रत्येक जण पाहातच राहिला. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. लग्न हे दक्षिण भारतातील आहे. लग्नात पाहुण्यांच्या केलेली ही जेवणाची व्यवस्था चर्चेचा विषय बनलीये.

पाहुण्यांसाठी सिंहासनाच्या डिझाइनसह शाही खुर्च्या लावण्यात आल्याचे दिसत आहे. स्टँडवर ताट ठेवून जेवत आहेत तेही खास आहे. सोनेरी रंगाच्या खुर्च्या आणि प्लेट स्टँड सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. काहींनी याला शाही विवाह म्हटले आहे.