उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन, मोफत गॅस कसा मिळवाल?

| Updated on: Sep 18, 2021 | 10:23 AM

उज्ज्वला योजनेसाठी E-KYC अनिवार्य आहेत. आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच द्रारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी सरकारकडून देण्यात आलेले केशरी रेशनकार्डही गरजेचे आहे. | Ujjwala scheme 2.0

उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन, मोफत गॅस कसा मिळवाल?
उज्ज्वला गॅस योजना
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्य प्रदेशच्या एकदिवसीय दौऱ्यात उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’चा दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली होती. उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू झाली होती. याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील पाच कोटी महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी यामध्ये सात श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी निर्धारित लक्ष्य 8 कोटीपर्यंत वाढवण्यात आले.

उज्ज्वला गॅस योजनेसाठी कोण पात्र?

उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी फक्त महिला असतील. गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षे असले पाहिजे. एकाच घरात उज्ज्वला योजनेची एकापेक्षा जास्त कनेक्शन्स नसावीत.

उज्ज्वला योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

उज्ज्वला योजनेसाठी E-KYC अनिवार्य आहेत. आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच द्रारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी सरकारकडून देण्यात आलेले केशरी रेशनकार्डही गरजेचे आहे. लाभर्थी कुटुंबातील सदस्यांची ओळखपत्रेही गरजेची आहेत. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड देणे बंधनकारक असेल.

एक कोटी गॅस कनेक्शन मोफत वाटणार

2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एक कोटी अधिक एलपीजी कनेक्शन वाढवण्याची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना -2 अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या या एक कोटी एलपीजी जोडण्यांतर्गत भरलेले सिलेंडर आणि स्टोव्ह मोफत दिले जातील. उज्ज्वला योजना -2 चा लाभ घेण्यासाठी, लाभार्थ्यांना फार कमी औपचारिकता करावी लागेल आणि स्थलांतरित कामगार कुटुंबांना रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा दाखवण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
>> pmujjwalayojana.com वर क्लिक करा.
>> होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा.
>> डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.
>> आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.
>> आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.
>> त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.
>> फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा

कोणत्या कागदपत्रांची गरज लागणार?

* बीपीएल रेशनकार्ड
* सरपंचाकडून मिळालेले अधिकृत बीपीएल प्रमाणपत्र
* अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी बँकेत बचत खाते
* आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
* पासपोर्ट साईज फोटो
* योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरी एलपीजी कनेक्शन असता कामा नये.

संबंधित बातम्या:

Ujjwala 2.0: मोफत गॅस कनेक्शन योजना पुन्हा सुरु होणार, पंतप्रधान मोदींकडून होणार उद्घाटन

आपल्या एलपीजी सिलेंडरशी संबंधित बदलला हा नियम; बुकिंगचे टेन्शन झाले दूर, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

1 ऑक्टोबरपासून खर्च वाढणार, CNG आणि PNG महागणार