SBI च्या खात्याशी सलंग्न असलेला मोबाईल नंबर बदलायचाय, हेल्पलाईन आणि इंटरनेट बँकिगद्वारे असा बदला क्रमांक

| Updated on: Jun 18, 2021 | 4:26 PM

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना खात्याशी संलग्नित असणारा फोन नंबर बदलण्याविषयी माहिती दिली आहे. SBI account

SBI च्या खात्याशी सलंग्न असलेला मोबाईल नंबर बदलायचाय, हेल्पलाईन आणि इंटरनेट बँकिगद्वारे असा बदला क्रमांक
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स दिल्यात. तुम्ही सवलतीच्या दरातील कर्जापासून ते विशेष ठेवी योजनांपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
Follow us on

नवी दिल्ली: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना खात्याशी संलग्नित असणारा फोन नंबर बदलण्याविषयी माहिती दिली आहे. सर्वसाधारपणे अनेकांना बँकेच्या खात्याशी सलंग्न असलेला फोन नंबर कसा अपडेट करायचा या बद्दल माहिती नसते. एका बँक ग्राहकानं स्टेट बँकेकडे खात्याशी संलग्नित असलेला फोन नंबर बदलण्यासंदर्भात माहिती मागितली त्यावेळी स्टेट बँकेकडून याबद्दल माहिती देण्यात आली. (How to change your mobile number register with SBI account through YONO helpline number and Internet Banking)

एका बँक ग्राहकानं स्टेट बँकेला ट्विटरवर त्यानं त्याचा फोन नंबर बदललेला आहे. त्यामुळे योनो अ‌ॅप वापरताना अडचण येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानं स्टेट बँकेच्या हेल्पलाईनवर अनकेदा संपर्क साधला. बँकेने त्यानंतर फोन नंबर बदलण्याबाबत माहिती जारी केली आहे.

बँकेने काय सांगितलं?

स्टेट बँक ऑफ इंडियानं ट्विटरवरुन बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदलणे, जुना क्रमांक काढून टाकणे याविषयी माहिती दिली. नोंदणीकृत मोबाईलवरुन योनो हेल्पलाईन 1800111101 या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगण्यात आलं आहे. योनो हेल्पलाईन क्रमांकावर फोन केल्यानंतर तुम्ही भाषा निवडा. त्यानंतर मोबाईल क्रमांक काढण्यासाठी सांगण्यात आलेल्या सूचनांप्रमाणं प्रक्रिया पूर्ण करा.

ऑनलाईन बँकिंगद्वारे फोन क्रमांक कसा बदलायचा?

  1. सर्वप्रथम SBI इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगीन करा.
  2. ‘माय अकाऊंटस अँड प्रोफाइल’ वर क्लिक करा
  3. प्रोफाइल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहितीवर क्लिकक करा
  4. मोबाइल नंबर वर क्लिक करा आणि नवीन डिटेल्स भरा
  5. तुमच्याकडे मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तीन पर्याय आहेत. पहिला ओटीपी, दुसरा एटीएमद्वारे इंटरनेट बँकिंग रिक्वेस्ट अप्रुव्हल आणि तिसरा कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क करणे हा आहे.
  6. पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कार्ड डिटेल्स आणि कॅप्चा टाकावा लागेल.यानंतर प्रोसिड वर क्लिक करा
  7. यापुढे स्क्रीनवरील मोबाईन नंबर अपडेशन वर क्लिक करा, यानंतर तुम्हाला जुन्या आणि नव्या अशा दोन्ही क्रमांकावर मेसेज येईल.
  8. दोन्ही क्रमांकावर आलेला मेसेज तुम्हाला 567676 या क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर फोन नंबर बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

संबंधित बातम्या:

मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार

Petrol & Diesel rate: पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का; पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी म्हणतात…

How to change your mobile number register with SBI account through YONO helpline number and Internet Banking