AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol & Diesel rate: पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का; पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी म्हणतात…

Petrol and Diesel rates | या बैठकीला पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्यासह आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल आणि गेल या पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संसदीय समितीमधील सदस्यांनी या अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला.

Petrol & Diesel rate: पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का; पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी म्हणतात...
पेट्रोल-डिझेल दर
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 18, 2021 | 11:48 AM
Share

नवी दिल्ली: देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच संसदीय समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना इंधनाच्या वाढत्या दरांविषयी विचारणा करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलचे दर कशाप्रकारे नियंत्रणात आणता येतील, त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, अशी विचारणा खासदारांनी केली. (Petrol and Diesel rates in country)

यावर पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी हात झटकण्याचे काम केले. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीवर ठरतात. त्यामुळे यामध्ये आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही, असा एकंदरित सूर पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लावला. या बैठकीला पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्यासह आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल आणि गेल या पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संसदीय समितीमधील सदस्यांनी या अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची उत्तर पाहता तुर्तास तरी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर भरभर वाढायला सुरुवात झाली होती. तेव्हापासून इंधनाच्या दरात साधारण 24 वेळा दरवाढ झाली असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 29 मे रोजी मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते.

दररोज 6 वाजता किंमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशाप्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

संबंधित बातम्या:

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

Petrol and diesel price: देशभरात इंधन दरवाढीची ‘साथ’; मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार

आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

(Petrol and Diesel rates in country)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?