Railway : भारतातील रेल्वे स्थानकांची नावे का असतात पिवळ्या पाटीवर? कारण ऐकून म्हणाल काय डोक्यलिटी आहे?

| Updated on: Dec 15, 2022 | 10:08 PM

Railway : रेल्वे स्थानकांची नावे पिवळ पाटीवर काळ्या अक्षरातच का लिहल्या जाते..

Railway : भारतातील रेल्वे स्थानकांची नावे का असतात पिवळ्या पाटीवर? कारण ऐकून म्हणाल काय डोक्यलिटी आहे?
पिवळ्या रंगाचे रहस्य काय?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतून (Indian Railway) तुम्ही कधी ना कधी प्रवास केलाच असेल. देशात जवळपास 7 हजारहून अधिक रेल्वे स्टेशन (Railway Station) आहे. या स्थानकातून 20 हजारांपेक्षा अधिक रेल्वे निघतात. रोज लाखो प्रवाशी रेल्वेतून प्रवास करतात. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी हा एक आहे. पण कोणत्याही स्टेशनवर जा, तुम्हाला त्या स्थानकाचे नाव पिवळ्या पाटीवर (Yellow Name Plate) काळ्या अक्षरातच (Black Letters) का लिहल्या जाते?

प्रत्येक रेल्वे स्टेशनची (Railway Station) नावे कायम पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात लिहिल्या जातात. तसेच रेल्वे स्टेशनवरील इतर दिशा निर्देशही पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात लिहण्यात येतात. यामागील कारणं तुम्हाला माहिती आहे का? ही काही अंधश्रद्धा नाही तर त्यामागे विज्ञान आहे.

देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचे (Railway Station) नाव पिवळ्या रंगावर काळ्या अक्षरात लिहिण्यात येतात. कारण पिवळा रंग तुम्हाला दूरनही आकर्षित करतो. त्यामुळे लोको पायलटला रेल्वे स्टेशन येण्यापूर्वीच हा बोर्ड दिसतो. तसेच दिवस आणि रात्री दोन्ही वेळा चमकदार पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे चालकाला स्टेशनचे नाव दूरनच दिसते आणि त्याला थांबण्याचे सिग्नल मिळते.

हे सुद्धा वाचा

तसेच पिवळा रंग डोळ्यांना सुखावणारा असतो. तो डोळ्यांना त्रासदायक नसल्याचे मत आहे. त्यामुळे अंत्यत गर्दीच्या स्थानकावरही हा साईन बोर्ड तुम्हाला दिलासा देतो. तसेच हा बोर्ड लोको पायलटला जागरुक करतो. लोको पायलट प्लॅटफॉर्म थांबायचे नसेल तरी तो हॉर्न वाजवून लोकांना जागरुक करतो.

पिवळ्या बोर्डावर काळ्या रंगातच रेल्वे स्थानकाचे नाव लिहिण्यात येते. तसेच इतर निर्देश आणि फलकही पिवळ्या रंगाची असतात. त्यावर काळ्या अक्षरात ही माहिती लिहिण्यात येते. त्यामुळे ही अक्षरे दूरुन दिसून येतात. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे चालकाला सूचना आणि स्थानकाचे नाव स्पष्टपणे लक्षात येते.

अनेकांना वाटत असेल की लाल रंग तर अत्यंत भडक आणि लक्षणीय असतो. तो का नाही वापरत? रेल्वे स्टेशनची नावे लाल रंगाच्या पाटीवर का लिहिण्यात येत नाही. लाल रंग हा धोक्याची निशाणी म्हणून वापरल्या जातो. त्यामुळे या रंगाचा वापर करण्यात येत नाही.