
तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं पीएफ खातंही असेल. आपल्या मासिक पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जमा केला जातो. यात कंपनीचाही हातभार लागतो. नोकरी बदलली तरी तुमचे पीएफ खाते सक्रिय राहते आणि आपल्या दुसऱ्या कंपनीच्या पगारातून कपात करून पीएफ जमा होण्यास सुरुवात होते.
पीएफ खात्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी निधी तर गोळा करताच, पण त्यावर सरकारकडून खूप चांगल्या व्याजदराने व्याजही मिळतं.अनेकांना वाटते की नोकरी गेली तर पीएफ खात्यात व्याज मिळत राहील का? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
नोकरी सोडल्यावर पीएफ खात्यात व्याज मिळेल का?
पीएफ खात्याचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ करते. त्यासाठी ईपीएफओने अनेक नियम केले आहेत. या नियमांनुसार, जर तुमची नोकरी गेली आणि तुम्ही इतरत्र काम करत नसाल तर अशा परिस्थितीत तुमच्या पीएफ खात्यात कोणतीही रक्कम जमा होणार नाही. अशावेळी तुम्हाला केवळ 3 वर्षांपर्यंतच व्याजाचा लाभ मिळणार आहे. 3 वर्षांनंतर तुम्हाला व्याजाचा लाभ मिळणे बंद होईल.
नोकरी गेल्यास पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात?
जर तुमची नोकरी गेली तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. मात्र, पैसे काढण्यासाठीही काही नियम आहेत. नोकरी सोडल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम काढू शकता. तर नोकरी सोडल्यानंतर 2 महिन्यांनी तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची पूर्ण रक्कम काढू शकता.
समजा तुम्हाला 5 लाख रुपयांची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर त्याचा फटका तुमच्या रिटायरमेंट फंडाला बसेल. पीएफवर 8.25 टक्के व्याज मिळते. यासोबतच कंपाउंडिंगचाही फायदा होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही 5 लाख रुपये काढले तर येत्या 5 वर्षात तुम्हाला 2.45 लाख रुपयांचे व्याज गमवावे लागेल.
लग्नासाठी पैसे काढण्याची परवानगी
PF अंशधारकही कालावधी पूर्ण केल्यानंतर अंशत: पैसे काढण्यास पात्र ठरतात. उदाहरणार्थ, EPFO च्या पैशातून आपल्याला घर बांधावे लागते, कर्जाची परतफेड करावी लागते किंवा विशिष्ट आजारांच्या उपचारांसाठी आपल्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी काही नियमात पैसे काढण्याची परवानगी असते. याशिवाय इतर कारणांसाठीही तुम्ही पैसे काढू शकता.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)