नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतायेत? मग ‘आयआरसीटीसी’ ही खास ऑफर तुमच्यासाठी

नववर्षाच्या स्वागतासाठी ज्या भाविकांना उज्जैनला जाण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी आयआरसीटीसीकडून खास ऑफर सुरू करण्यात आली आहे. उज्जैनसोबतच या पॅकेजमध्ये इंदौर शहराचा देखील समावेश आहे. इंदौर हे एक ऐतिहासिक शहर आहे. शहरात अनेक पर्यटनस्थळे आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतायेत? मग आयआरसीटीसी ही खास ऑफर तुमच्यासाठी
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांतच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पर्यटनाचा प्लॅन बनवत असतात. नवीन वर्षामध्ये तुमची देखील कुठे बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही मध्यप्रदेशमधील उज्जैनला जाऊ शकता. उज्जैनमध्ये 12  ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर मंदिर आहे.  महाकालेश्वराच्या दर्शनाने तुमच्या वर्षाची सुरुवात होऊ शकते. नववर्षाच्या स्वागतासाठी ज्या भाविकांना उज्जैनला जाण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी आयआरसीटीसीकडून खास ऑफर सुरू करण्यात आली आहे. उज्जैनसोबतच या पॅकेजमध्ये इंदौर शहराचा देखील समावेश आहे. इंदौर हे एक ऐतिहासिक शहर आहे. शहरात अनेक पर्यटनस्थळे आहेत.

‘असा’ असेल प्रवास 

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयआरसीटीसीकडून प्रवाशांसाठी हे खास टूर पॅकेज बनवण्यात आले आहे. पुण्यातून दुपारी साडेतीनला प्रवासाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्रभर प्रवास करून प्रवासी सकाळी इंदोरमध्ये पोहोचतील. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर आयआरसीटीसीकडून पर्यटकांना इंदौर शहर फिरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये शहरातील हिंडोळा महाल, जहाज महाल, मांडू किल्ला, बाज बहादूर पॅलेस अशा अनेक  ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे. त्यानंतर रात्री पर्यटक पुन्हा हॉटेलवर परततील. दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून चेक आऊट करून बाहेर पडल्यानंतर ओंकारेश्वर मंदिर आणि महेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन, भाविक उज्जैनकडे रवाना होणार आहेत. उजैन्नमध्ये  महाकालेश्वर मंदिर आहे. तसेच इतर अनेक देविदेवतांचे मंदिर देखील आहेत. त्यांच्या दर्शनाचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे.

प्रवासाचे भाडे

आयआरसीटीसीकडून अतिशय स्वस्त दरामध्ये पर्यटकांना हे पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या चार दिवसांच्या ट्रिपसाठी व्यवस्थापनाकडून अवघे 8190 रुपये प्रति प्रवासी आकारले जाणार आहेत. यामध्ये तुमचा प्रवास, राहाणे, फिरणे आणि खाण्याच्या खर्चाचा समावेश असणार आहे. थोडक्यात काय तर तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये चांगल्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. 

संबंधित बातम्या 

Road Ministry New Navigation App : अपघाताचा धोका होणार कमी! रस्ते मंत्रालयानं लाँच केलं नेव्हिगेशन अॅप

पीएफ संदर्भात महत्वाचा अलर्ट, डेडलाईन संपली तर होऊ शकते नुकसान, आळस झटका आणि वारसाचं नाव जोडा 

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ?