
आर्थिक वर्ष 2024 साठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख 31 जुलै होती. यावेळी सुमारे 7.5 कोटी लोकांनी आयटीआर भरला होता. आयकर रिटर्न भरणारे अनेकांचे रिफंड वेळेवर आले पण अजूनही अनेक जणांना रिफंड मिळालेले नाहीत. तुम्ही आयकर परतावा मिळाला नसेल तर तो का मिळाला नाही? ही प्रक्रिया कुठे अडकली? जाणून घ्या या प्रश्नांचे उत्तर…
आयटीआर रिफंडसाठी तुम्ही फॉर्म कोणता भरला आहे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आयटीआर भरण्याचे तीन प्रकार आहेत. नोकरी करणारे ITR 1 हा फॉर्म भरतात. ITR 2 हे अनिवासी भारतीय आणि भारतात राहणाऱ्या हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी आहे. हा फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत असू शकतो. यामध्ये परदेशातील उत्पन्न आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. त्यानंतर व्यावसाय करणारे ITR 3 भरतात.
ITR 1 म्हणजेच फॉर्म 1 भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत प्रक्रिया केली जाते. तर फॉर्म 2 साठी 20 ते 45 दिवस लागतात. फॉर्म 3 साठी 1 ते 2 महिने लागतात. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परतावा मिळाला नसेल, तर तुम्ही त्यासाठी आयटीआर परतावा स्थिती तपासू शकता. त्यासाठी खालील प्रक्रिया करा.
तुमचा आयटीआर अयशस्वी झालेले असल्यास तुमचे खाते व्हेरिफाय केलेले नसेल. तुमच्या खाते आणि तुमच्या नावात काही फरक असू शकतो. याशिवाय बँक खाते किंवा IFSC कोड चुकीचा असू शकतो. त्यासाठी पुन्हा पडताळणी करा. त्यानंतर परतावा तुम्हाला येईल.