जनरल ते डिलक्स रुम, आरोग्य विम्यात नेमकी तरतूद काय; खर्चाचं गणित?

| Updated on: Apr 27, 2022 | 11:13 PM

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वात महत्वाचं ठरतं रुमच भाडं. विमा खरेदीवेळी रुम संदर्भातील अटी व शर्ती पूर्णपणे वाचल्या जात नाही. त्यामुळे रुग्णालयाचं बिल आल्यानंतर मनस्तापासोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

जनरल ते डिलक्स रुम, आरोग्य विम्यात नेमकी तरतूद काय; खर्चाचं गणित?
Health Insurance
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्लीः कोविड प्रकोपात (COVID CRISIS) रुग्णालयात भरती होण्यासाठी वेटिंग, लाखोंचे बिल यामुळे अनेकांच्या मनात रुग्णालय म्हटलं की धडकी भरते. आकस्मिक कारणांमुळे कोलमडणारं आर्थिक बजेट सावरण्यासाठी आरोग्य विमा (HEALTH INSURANCE) खरेदी करण्यासाठी अनेकांचा कल वाढीस लागला आहे. आरोग्य विम्याचे विविध निकष असतात. प्रत्यक्ष उपचार घेतल्यानंतर बिल सादर केल्यानंतर त्याबद्दलची माहिती विमा धारकाला समजते. रुग्णालयातील खर्चाच्या प्रतिपूर्ती विशिष्ट मर्यादेतच करण्याची काही आरोग्य विम्यात तरतूद असते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वात महत्वाचं ठरतं रुमच भाडं. विमा खरेदीवेळी रुम संदर्भातील अटी व शर्ती पूर्णपणे वाचल्या जात नाही. त्यामुळे रुग्णालयाचं बिल आल्यानंतर मनस्तापासोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विमा खरेदी करतेवेळीच रुम कॅपिंगच्या (ROOM CAPPING) शर्ती अवश्य वाचायला हव्यात.विमा कंपन्यांकडून संपूर्ण विम्याचे पैसे अदा केले जात नाही. विशिष्ट निर्धारित प्रमाणातच पैसे देय केले जातात.

रुम दराच्या अटी-

एकूण विमा रकमेच्या एक टक्क्यापर्यंत रुम खर्च विमा कंपन्यांकडून दिला जातो. समजा, तुमचा आरोग्य विमा पाच लाखांचा असल्यास तुम्हाला रुम खर्च पाच हजार रुपयांपर्यंत दिले जाईल. रुग्णालयात विविध प्रकारच्या रुम उपलब्ध असतात. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात पंचतारांकित सुविधा उपलब्ध असणाऱ्या देखील रुम असतात. रुमसाठी तुम्ही प्रतिदिवस दहा हजार रुपये अदा केले असल्यास मात्र विम्यात पाच हजारांची तरतूद असल्यास तुम्हाला अतिरिक्त पाच हजारांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

..हा पर्याय बेस्ट!

रुम खर्चामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी रुम खर्चावर मर्यादा नसणारा विम्याचा पर्याय निवडण्याची शिफारस केली जाते. जेणेकरुन विमा 2000 रुपयांचा असो किंवा 20 हजारांचा त्यामुळे खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालयाचा असलेला खर्चाची पूर्तता विमा कंपनीकडून केली जाईल. त्यामुळे विमा खरेदी करण्यापूर्वी एकदा रुमच्या अटी व शर्ती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा.

आरोग्य विमा खरेदी करताना…

आरोग्य विमा ही काळाची गरज बनली आहे. सध्या विविध कंपन्यांकडून विविध स्वरुपाच्या आरोग्य विम्याच्या सेवा उपलब्ध केल्या जातात. यामध्ये वयोगट ते आजाराचा प्रकार यानुसार भिन्नता आढळते. त्यामुळे आपल्या निकषानुसार आरोग्य विमा खरेदी करण्यास नेहमी प्राधान्य द्यायला हवे.