हायटेक बँकिंगचे दावेदारच सायबर भामट्यांचे ‘शिकार’! कोटक महिंद्राच्या ग्राहकांची सर्वाधिक लूट, ICICI बँक फसवणुकीच्या जाळ्यात

| Updated on: Mar 15, 2022 | 8:03 AM

हायटेक आणि सुरक्षित बँकिंगचे दावे करणा-या अनेक बँकांनाच सायबर भामट्यांनी लक्ष्य करत त्यांच्या खातेदारांची आयती शिकार केली आहे. देशभरात दरवर्षी ऑनलाईन भामटेगिरी वाढत आहे. फसवणुकीची आकडेवारी कमी न होता वाढत आहे. गेल्या 9 महिन्यात कोटक महिंद्रा बँकेत फसवणुकीच्या 642 घटना उजेडात आल्या आहेत.

हायटेक बँकिंगचे दावेदारच सायबर भामट्यांचे शिकार! कोटक महिंद्राच्या ग्राहकांची सर्वाधिक लूट, ICICI बँक फसवणुकीच्या जाळ्यात
ऑनलाईन फसवणूक
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुंबई : कोटक महिंद्रा बँकेत (Kotak Mahindra Bank) सर्वाधिक फसवणूक झाल्याचे उजेडात आले आहे. सरकारने सोमवारी संसदेत याविषयीची आकडेवारी पटलावर मांडली. संसदेच्या आर्थिक सत्रात (Budget Session) सरकारने याविषयीची माहिती सादर केली. गेल्या वर्षी 2021-22 च्या सुरुवातीच्या 9 महिन्यांत कोटक महिंद्रा बँकेत सर्वाधिक बँक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या 9 महिन्यांत फसवणुकीच्या 642 घटना समोर आल्या आहेत. या फसवणुकीत 1 लाख रुपयांहून अधिकचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. कोटक महिंद्रा एकटीच या सायबर भामट्यांची शिकार झालेली नाही तर अनेक छोट्या-मोठ्या बँका या फसवणुकीच्या मायाजाळात अडकल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) 518 तर इंडसइंड बँकेत ( IndusInd Bank) फसवणुकीच्या 377 घटना घडल्या आहेत. सहाजिकच ग्राहकांना यामध्ये गंडा घालण्यात आला. ऑनलाईन बँकिंग ही तुमच्या सुविधेसाठी आणि जलद सेवेसाठी आहे. त्यामाध्यमातून सायबर भामट्यांना आयती कमवण्याची संधी देऊ नका. सजगता ठेवली तर तुम्हचा या फसवणुकीत नंबर लागणार नाही.

जागरुकता वाढल्याचा मध्यवर्ती बँकेचा दावा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढत्या सायबर फसवेगिरीला आळा घालण्यासाठी बँकांच्या मदतीने मोठा जनजागृतीचा ड्राईव्ह आयोजीत केला. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. प्रसार माध्यमातून, दृकश्राव्य माध्यमातून, जाहिरातीद्वारे ऑनलाईन फसवेगिरीची माहिती देण्यात येते. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. वास्तविक अनेक जण धाकापोटी आणि बदनामीपोटी तक्रार देताचच असे नाही. तसेच भामटे अनेक युक्त्या वापरतात. त्यामुळे सजग नसलेला ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकतो. फसवेगिरीला आळा घालण्यासाठी केंद्रीय मध्यवर्ती बँकेने नियम आणि प्रक्रियेत अनेक बदल केले आहे.

कोटकला हवा सुरक्षेचा कोट

अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत या फसवेगिरीची माहिती आणि घटनांचा पाढा वाचला. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या फसवणुकीची गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी त्यांनी जनतेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवली. यामध्ये सर्वाधिक शिकार कोटक महिंद्रा बँक झाल्याचे समोर आले आहे. कोटक महिंद्रामध्ये 2017 मध्ये फसवणुकीच्या 135 घटना समोर आल्या होत्या. तर 2018 मध्ये यामध्ये वाढ होऊन 289, 2019 मध्ये 383, 2020 मध्ये 652 आणि 2021 मध्ये 826 फसवणुकीच्या घटना समोर आल्या. आरबीआयची आकडेवारी सादर करत, कराड यांनी 2021-22 या एप्रिल-डिसेंबर या महिन्यांत कोटक बँकेला सायबर भामट्यांनी सर्वाधिक तडाखा दिल्याचे समोर आले. फसवणुकीच्या 642 घटना झाल्याचे समोर आले.

संबंधित बातम्या :

केंद्रीय बँकेच्या नावाने पैसे उकळणारी टोळी सक्रिय, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहाल?

ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, फसवणूक टाळण्यासाठी या पद्धतींचा वापर करा

सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा, लाखो रुपयांची केली फसवणूक