AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, फसवणूक टाळण्यासाठी या पद्धतींचा वापर करा

कोरोनाच्या काळात अधिक लोकांनी ऑनलाईन सगळं स्विकारलं असल्याचं वाटतंय. कारण अनेकांनी आपल्याकडे कॅश किंवा अन्य घटक ऑनलाईन करण्यात अनेकांना सध्या खूप बरं वाटतंय.

ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, फसवणूक टाळण्यासाठी या पद्धतींचा वापर करा
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 1:50 PM
Share

कोरोनाच्या (corona) काळात अधिक लोकांनी ऑनलाईन (online) सगळं स्विकारलं असल्याचं वाटतंय. कारण अनेकांनी आपल्याकडे कॅश (cash) किंवा अन्य घटक ऑनलाईन करण्यात अनेकांना सध्या खूप बरं वाटतंय. पण असे व्यवहार किंवा बँकेतील (bank) एखादं काम तुम्ही ऑनलाईन करीत असाल तर तुम्ही त्याची काळजी घ्या. त्यावर अनेक ऑनलाईन फ्रॉड करणा-याचं लक्ष असतं. तसेच त्यांच्या तावडीत तुम्ही एकदा सापडला तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे शक्यतो खात्री केल्याशिवाय कोणतीही ऑनलाईन प्रोसेस करू नका. कारण ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. अॅक्सीस बँकेने ग्राहकांच्यासाठी एक सल्ला दिला आहे. तुम्ही एखादं ऑनलाईन कर्ज किंवा इतर कोणत्याही गोष्टी करीत असताना काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.

तुम्हाला मिळत असलेल्या फ्री वायफायपासून लांब राहा

तुम्हाला एखादं कर्ज काढायचं असेल किंवा बॅकेसंदर्भात एखादी गोष्ट जरी करायची असेल तरी तुम्हाला तिथं तुमची कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन दाखवावी लागतात. त्यामुळे हे काम तुम्ही तुमच्या नेटवरून केलेलं अधिक चांगलं असेल असं वाटतंय. तुम्ही तुमच्या कार्यालयातील इंटरनेट किंवा कोणत्याही हॉटेलमधील इंटरनेट वापरा कारण त्यामुळे तुमचा डाटा लिंक होण्याची शक्यता कमी असते. सायबर कॅपेमध्ये अशी कामे करू नये. तिथं तुम्हाला अधिक धोका असतो असं अनेक प्रकरणांमधून दिसून आलंय. चुकून जरी तुम्ही अशा ठिकाणी गेलात किंवा तिथं तुम्ही एखादा संगणक वापरला तर तुमचं काम झाल्यानंतर तिथं पटकन लॉग आऊट करा. तसेच तिथली हिस्ट्री ,डाऊनलोड फाईल्स पहिल्या डिलेट करा.

खात्री केल्याशिवाय ऑनलाईन कागदपत्रे देऊ नये

ज्या बँकेत तुमचं खात असेल तिथल्या बँकेचं ऑनलाईन अॅप्लीकेशन खात्री असल्याशिवाय वापरू नये. तुम्हाला बँकेचं एखादं अॅप्लीकेशन एक सारखं तयार केलेलं दिसेल त्यामुळं तुम्ही खात्री केल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया करू नये. तुम्हाला जे ऑनलाईन फसवतात, ते मेल आयडी किंवा मेसेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचतं असतात. तुम्हाला प्राप्त झालेल्या मेल आयडीवरती किंवा मॅसेजच्या लिंकवरती क्लिक करू नका, त्यामुळे सुध्दा तुम्हाला धोका पोहचू शकतो. तुम्ही संबंधित बँकेच्या वेबसाईटवरती जा, तिथं तुम्हाला अधिकृत माहिती मिळेल. तुम्हाला खात्री असल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया करू नका.

घरबसल्या विका जुने स्मार्टफोन… जाणून घ्या फ्लिपकार्टचा नवीन प्रोग्राम

Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

IPO आधी LICला मोठा फटका! कोरोनामुळे पॉलिसीच्या विक्रीत मोठी घट, गेल्या 3 वर्षात किती नुकसान?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.