Share | गुंतवणूकदारांचं उरलंसुरलं अवसान गळालं..या कंपनीचा घसरणीत पुन्हा रेकॉर्ड..

| Updated on: Sep 22, 2022 | 5:12 PM

Share | या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे उरलंसुरलं अवसानं ही गळालं आहे. गाजावाजा करुन बाजारात आलेल्या या शेअरला लवकर उतरती कळा लागली का?

Share | गुंतवणूकदारांचं उरलंसुरलं अवसान गळालं..या कंपनीचा घसरणीत पुन्हा रेकॉर्ड..
या स्टॉक्सची घसरण थांबणार कधी?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : या शेअरमुळे (Share) गुंतवणूकदारांचे (Investors) उरलंसुरलं अवसानं ही गळालं आहे. गाजावाजा करुन बाजारात आलेल्या या शेअरला इतक्यात उतरती कळा लागली काय, अशी शंका गुंतवणूकदारांना येत आहे. या शेअरने बाजारात निच्चांकाचे नवे विक्रम (Lowest Record) प्रस्थापित केले आहे.

तर ही कंपनी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची आपल्याला ओळख आहेच. मोठा गाजावाजा करुन या कंपनीचा IPO बाजारात दाखल झाला. पण गुंतवणूकदारांची पहिल्या दिवसापासूनच घोर निराशा झाली.

एलआयसीच्या शेअर बाजारात कामगिरी दाखवू शकला नाही. सातत्याने घसरणारी कामगिरी सांभाळता न आल्याने कंपनी पहिल्या 10 कंपन्यांच्या स्पर्धेतूनही बाहेर फेकल्या गेली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य तगडे आहे. पण बाजारातील कामगिरी खालावली आहे.

हे सुद्धा वाचा

एलआयसीचा शेअर NSE वर आज, 22 सप्टेंबर 2022 रोजी पुन्हा घसरला. आता हा शेअर 648 रुपयांवर आहे. हा त्याचा सर्वात निचांकी स्तर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. हा शेअरमध्ये तेजीचे सत्र कधी येईल असा सवाल गुंतवणूकदारांना छळत आहे.

तर दुसरीकडे सरकारने मोठा गाजावाज करत एलआयसीचा IPO बाजारात दाखल केला. तो सूचीबद्ध झाला. गुंतवणूकदाराच्या एकच उड्या पडल्या. पण दुसऱ्या दिसापासूनच आयपीओ सपाटून आपटला. त्याची घसरण काही थांबलेली नाही. सध्या आयपीओत 32 टक्क्यांची घसरण झाली आहे.

एलआयसी 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. त्यावेळी आयपीओची किंमती 949 रुपये इतकी होती. पहिल्याच दिवशी यामध्ये जवळपास 8 टक्क्यांची घसरण झाली. त्यानंतर एलआयसीचा शेअर आयपीओच्या निर्धारीत किंमत ही गाठू शकलेले नाहीत.