
नवी दिल्ली : भविष्यातील गुंतवणुकीसाठी (Future Savings) सुरक्षित आणि सर्वोत्तम परतावा देणाऱ्या योजनांच्या शोध सातत्याने घेतला जातो. भारतीय पोस्टाची (NSC )अर्थातच नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट योजना सर्वोत्तम ठरते. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate) हा भारत सरकारचा उपक्रम आहे. एनएससीचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे आणि सध्या वार्षिक 6.8 व्याजदर (Intrest rate) दिला जातो. जर तुम्ही 1.5 लाख गुंतवणूक करत असल्यास 5 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर 2,08,424 रक्कम मिळेल. NSC वरील व्याजदर चक्रव्याढ पद्धतीने असते. मात्र, व्याजाचे पैसे मॅच्युरिटीनंतरच मिळतात. NSC मध्ये किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात केली जाते आणि गुंतवणुकीसाठी कोणत्याही प्रकारची कमाल मर्यादा नसते.
कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही पोस्टात नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट प्राप्त करू शकतो. एनएससी अकाउंट वैयक्तिक किंवा संयुक्त स्वरुपात उघडले जाऊ शकते. 10 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन अर्जदाराच्या बाबतीत नामनिर्देशित व्यक्तीची आवश्यकता असेल.
• हिंदू अविभाजित कुटूंब (HUFs)
• ट्रस्ट किंवा आस्थापने
• खासगी कंपन्या
• अनिवासी भारतीय
NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) मधून 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पैसे काढण्यास अनुमती नाही. मात्र, वैयक्तिक खातेधारकाचा मृत्यू, संयुक्त खात्याच्या स्थितीत वैयक्तिक किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यूच्या स्थितीत पैसे काढले जाऊ शकतात. त्यासोबतच राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे जप्ती किंवा न्यायालयाच्या आदेशावर एनएससी मॅच्युअर होण्यापूर्वीच बंद केली जाऊ शकते.
1. एनएससी केवळ पोस्टातच मिळते
2. आयकर अधिनियम 80-सी अंतर्गत एनएसी मध्ये गुंतवणूक केलेले पैसे कर वजावटीस पात्र
3. एनएससी सुरुवात ते मॅच्युरिटी तारखेपर्यंत एकवेळ एका व्यक्तिहून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केली जाऊ शकते.
4. या योजनेत एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते.
5. सुरक्षा म्हणून गहाण किंवा हस्तांतरित केले जाऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तीला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये योग्य अर्ज सादर करावा लागतो. यासह, ज्याला तो गहाण ठेवत आहे त्याच्याकडून त्याला मंजुरीचे पत्रही द्यावे लागेल.
6. एनएससी ट्रान्सफरवेळी नवे प्रमाणपत्र प्रदान केले जात नाही. समान प्रमाणपत्रावर नव्या खातेधारकाचे नाव लावले जाते. पोस्टमास्तरच्या अधिकृत स्वाक्षरी आणि दिनांक त्यावर नमूद असतो.
7. एनएससी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यासाठी खालील परिस्थिती हवी
• खातेधारकाची मृत्यूवेळी नॉमिनी/कायदेशीर उत्तराधिकाऱ्याच्या नावे
• खातेधारकाच्या मृत्यूवेळी संयुक्त खातेधारकांच्या नावे
• न्यायालयाच्या आदेशानुसार
• सक्षम अधिकाऱ्याद्वारे खात्यावरील व्यवहारांना स्थगिती
ग्राहक हितासाठी एसबीआय करणार व्यवहारांमध्ये बदल, ‘हे’ नियम पुढील महिन्यापासून बदलणार
Epassport | आता विमान प्रवाशांच्या खिश्यात ई-पासपोर्ट
विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल; वाचा महत्वाचा नियम