Car without Loan : व्याजाचा एक छदाम न भरता खरेदी करा कार! जादू कसली, हा नियम फॉलो करा

| Updated on: Apr 02, 2023 | 5:59 PM

Car without Loan : कर्जाचा डोंगर डोक्यावर न घेता, व्याजाचा एक छदाम ही न भरता, तुम्हाला तुमची आवडती कार खरेदी करता येईल. पण त्यासाठी हा नियम फॉलो करावा लागेल, पण काय आहे हा नियम

Car without Loan : व्याजाचा एक छदाम न भरता खरेदी करा कार! जादू कसली, हा नियम फॉलो करा
Follow us on

नवी दिल्ली : पूर्वी घरासमोर कार (Car) असणे हे श्रीमंतीचं प्रतिक होते. परंतु, आता कार ही गरज झाली आहे. आता तर तंत्रज्ञानावर आधारीत कार बाजारात दाखल झाल्या आहेत. हॅचबॅकपासून तर एसयुव्ही कारची बाजारात रेलचेल आहे. खिशात पैसाच असावा असे काही नाही, पगारदार, नोकरदार, व्यापारी, सधन शेतकरी यांना तात्काळ कर्जावर कार घरी घेऊन जाता येते. पण जर तुम्हाला व्याज न भरता, कर्ज (Loan) न घेता चकचकीत चारचाकी घरासमोर उभी करायची असेल तर त्यासाठी एक नियम फॉलो करावा लागेल आणि काही वर्षे वाट पहावी लागेल. कार खरेदीची हे नियोजन तुम्हाला फायदेशीर ठरेल.

महिन्याला 40,000 रुपये पगार असणारी व्यक्ती पाच वर्षानंतर त्याचे कारचे स्वप्न पूर्ण करु शकते. त्यासाठी त्याला कार लोन घेण्याची गरज नाही अथवा व्याज देण्याची आवश्यकता नाही. एक मध्यमवर्गीय माणूस त्याचे स्वप्न पूर्ण करु शकतो. त्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक त्याला फायदेशीर ठरु शकते. तो पाच वर्षांत कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये मिळवता येतील.

बचतीच्या नियमाचे करा पालन

हे सुद्धा वाचा

जर तुमचा पगार 40,000 रुपये आहे, तर तुम्ही पाच वर्षानंतर स्वतःच्या पैशांनी कार खरेदी करु शकता. त्यासाठी प्रत्येक महिन्याला पगाराचे योग्य नियोजन करावे लागेल. बचतीसाठी तुम्हाला 50:30:20 या नियमाचे पालन करावे लागेल. या नियमानुसार, 50 टक्के रक्कम घर खर्चासाठी, 30 टक्के रक्कम अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी तर 20 टक्के रक्कम बचत करावी लागेल.

 किती करावी लागेल गुंतवणूक

दर महिन्याला 40,000 रुपये कमाई करत असाल तर त्यातील एक ठराविक रक्कम तुम्हाला दर महिन्याला बचत करावी लागेल. 40,000 रुपयातील 20 टक्के रक्कम बाजूला काढून ठेवावी लागेल. म्हणजे 8,000 रुपये दर महिन्याला वाचवावे लागतील. म्हणजे 32 हजार रुपये खर्चासाठी बाजूला राहतील.

म्युच्युअल फंडमध्ये करा गुंतवणूक

आजच्या परिस्थितीत गुंतवणुकीसाठी SIP सर्वात चांगला पर्याय आहे. साधारणपणे 12 टक्के कंपाऊंडिंग व्याजामुळे तुम्हाला पाच वर्षांत मोठी रक्कम उभारता येईल. मार्केट लिंक्ड असल्याने या योजनेत तुम्हाला व्याज पण तगडे मिळते. पण आपण साधारणपणे 12 टक्के व्याज गृहित धरुयात. प्रत्येक महिन्याला 8,000 रुपये एसआयपी केल्यास 5 वर्षात एकूण 4,80,000 रुपयांची गुंतवणूक होईल.

12 टक्के व्याज करेल मालामाल

पाच वर्षांत केलेल्या या बचतीवर 12 टक्के व्याज तुम्हाला मालामाल करेल. मुळ रक्कमेवर 1,79,891 रुपये व्याज मिळेल. केवळ 5 वर्षांत तुम्हाला 6,59,891 रुपये उभे करता येतील. व्याज अधिक टक्केवारीने मिळाल्यास तुमचा अधिक फायदा होईल. तुम्हाला 8 लाखांपर्यंत फायदा होऊ शकतो. तज्ज्ञाच्या सल्ल्याने योग्य म्युच्युअल फंड निवडल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल.