ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता RTO मध्ये खेटे घालण्याचा ताप वाचणार

| Updated on: Aug 05, 2021 | 9:41 AM

Driving License: नव्या नियमानुसार वाहन उत्पादक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्था परस्पर आपल्या वाहनचालकांना परवाने देऊ शकतील.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता RTO मध्ये खेटे घालण्याचा ताप वाचणार
आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे झाले सोपे
Follow us on

मुंबई: वाहन परवान्यासाठी (Driving License) केंद्र सरकारने नुकताच एक नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स हवे असल्यास तुम्हाला क्षेत्रीय परिवहन कार्यालयात (RTO) खेटे मारावे लागणार नाहीत. नव्या नियमानुसार वाहन उत्पादक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्था परस्पर आपल्या वाहनचालकांना परवाने देऊ शकतील.

मात्र, या सगळ्यांकडे वाहन प्रशिक्षण केंद्रासाठीचा परवाना असणे आवश्यक आहे. या संस्था आपल्या चालकांचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना वाहन परवाना देऊ शकतात. वाहन परवाना जारी करणाऱ्या संबंधित संस्थांकडे सर्व पायाभूत सुविधा आणि अन्य व्यवस्था असल्या पाहिजेत. केंद्रीय मोटरनियमन कायदा, 1989 मध्ये नमूद केलेले सर्व निकष या संस्थांनी पूर्ण केले पाहिजेत, असे निर्देश केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने दिले आहेत.

RC रिन्यू करण्यासाठीही सवलत

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून लोकांच्या सोयीसाठी नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सोपी बनवली आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं रिन्यूअल तुम्ही 60 दिवस आधी करु अॅडव्हान्समध्ये करु शकणार आहात. त्याचबरोबर टेम्पररी रजिस्ट्रेशनसाठी वेळीची मर्यादाही आता 1 महिन्यावरुन वाढवून 6 महिने करण्यात आली आहे.

ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही ट्युटोरियलच्या माध्यमातून घरबसल्याही करु शकणार आहात. कोरोना काळात संबंधित मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी काय आहे पद्धत ?

– ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.

– इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.

– अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.

– अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.

– यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.

संबंधित बातम्या:

Nitin Gadkari | Uncut | देशात 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस निघालीत, नितीन गडकरींची माहिती

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नाही द्यावी लागणार टेस्ट, वाचा काय आहे सरकारचा नवा नियम

आता रविवारीही ड्रायव्हिंग लायसन्स घ्या, पण याकडे विशेष लक्ष द्या!