खूषखबर! NPS सदस्यांना 4 वेळा बदलता येणार गुंतवणूक पॅटर्न, लवकरच दोन वेळा गुंतवणूक बदलाची मर्यादा वाढविली जाणार!

| Updated on: Dec 29, 2021 | 2:01 PM

NPS सदस्यांना आता वर्षातून दोनदा नव्हे तर चारदा गुंतवणूक पॅटर्न बदलता येणार आहे. वाढत्या महागाईवर सरकारने हा गुंतवणुकीचा उतारा दिला आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा एनपीएस सदस्यांना उपलब्ध होणार आहे.

खूषखबर! NPS सदस्यांना 4 वेळा बदलता येणार गुंतवणूक पॅटर्न, लवकरच दोन वेळा गुंतवणूक बदलाची मर्यादा वाढविली जाणार!
Follow us on

मुंबई : सरकारी पेन्शन योजना, NPS च्या सदस्यांसाठी खूषखबर आहे. त्यांना गुंतवणूक बदलाच्या वर्षभरात दोन अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता भागधारकांना वर्षातून दोनदा नव्हे तर 4 वेळा गुंतवणूक पॅटर्न बदलता येणार आहे.  पेन्शन फंड रेग्युलेटरी, पेन्शन निधी विनियमक आणि विकास प्राधिकरणाचे(PFRDA) अध्यक्ष सुप्रीतम बंदोपाध्याय यांनी याविषयीची घोषणा केली. त्यामुळे लवकरच नॅशनल पेन्शन स्कीम च्या सदस्यांना आर्थिक वर्षामध्ये चार वेळेस गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी देण्यात येईल. सध्या पेन्शन सिस्टिम सदस्यांना आर्थिक वर्षात दोनदा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या मर्यादेत वाढ करण्याची अनेक दिवसांची मागणी सदस्य करत होते. अखेर त्यांची ही मागणी  पूर्णत्वास आली आहे.

NPS आणि ASSOCHAM यांच्या संयुक्त विद्यमानाने याविषयी आयोजित वेबिनारमध्ये बंदोपाध्याय यांनी मर्यादा वाढीची माहिती दिली. सध्या भागधारक वर्षातून केवळ दोनदा गुंतवणूक पॅटर्न बदल करू शकतात. येत्या काही दिवसात भागधारकांना वर्षातून चार वेळा गुंतवणुकीत बदल करता येणार आहे. सरकारी सिक्युरिटी, बॉंड, शेअर, शॉर्ट टर्म बॉण्ड गुंतवणूक अशी ही गुंतवणूक असेल.

नियम एकसारखे नाहीत

सरकारी आणि खासगी सदस्यांना गुंतवणूक करताना नियम एक सारखे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना जोखमीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर खासगी क्षेत्रातील सदस्यांना एकूण रक्कमेच्या 75 टक्के गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे.

आयसीआयसीआय प्रूडेंशियल पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनी, एलआईसी पेन्शन फंड, कोटक महिंद्रा पेन्शन फंड, एसबीआई पेन्शन फंड, यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशंस, एचडीएफसी पेन्शन मॅनेजमेंट कंपनी और बिर्ला सन लाइफ पेन्शन मॅनेजमेंट या कंपन्या एनपीएस योजनेत पेन्शन फंड मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. वर्षभरात यातही एक फंड मॅनेजर बदलता येईल.

हेही वाचा :

नवीन वर्षात स्वयंपाकाला महागाईची फोडणी? डिजिटल पेमेंटमुळे खिशाला कात्री, नियमांच्या नावाखाली बँकांची वसुली 

आरोग्य विमा कंपन्यांच्या फसवणुकीवर जालीम इलाज, हक्कांविषयी रहा जागरूक, बिनधास्त करा कंपन्यांच्या दाव्याची चिरफाड

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण