

पीटीआयच्या वृत्तानुसार, पेटीएमने सोमवारी पोस्टपेड मिनी सर्व्हिसची ऑफर दिली आहे, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या मासिक खर्चासाठी 250 ते 1000 रुपयांपर्यंत त्वरित कर्ज मिळू शकते.

पेटीएमने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ही ऑफर त्याच्या 'बाय नाऊ पे लेटर'(Buy Now Pay Later) सेवेचा विस्तार आहे, ज्याच्या मदतीने एखाद्याला त्वरीत कमी किमतीची कर्जे मिळू शकतात. कंपनीने सांगितले की 30 दिवसांपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

पोस्टपेड मिनीला आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडच्या भागीदारीत सादर करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत हे कर्ज मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज, गॅस सिलिंडर बुकिंग, वीज आणि पाण्याची बिले या खर्चासाठी देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

पेटीएम पोस्टपेड आपल्या वापरकर्त्यांना डिजिटल क्रेडिट ऑफर करते आणि रोखपेक्षा डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देणार्यांना मोठा दिलासा मिळाला. ज्या वापरकर्त्यांकडे पैशांची कमतरता आहे आणि पुढच्या महिन्यात पैसे देऊ शकतात अशा वापरकर्त्यांसाठी हे फारच किफायतशीर आहे.