AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टाची ही योजना बचतीसाठी आहे ‘बेस्ट’, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये…

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये ‘नॅशनल सेव्हींग्स्‌ सर्टीफिकेट’ (NSC) देखील समाविष्ट आहे. या छोटया बचतीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केल्यास मिळत असलेल्या परतावादेखील समाधानकारक आहे.

पोस्टाची ही योजना बचतीसाठी आहे ‘बेस्ट’, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 26, 2022 | 1:23 PM
Share

मुंबई : गुंतवणुकीचा विषय आला की, जुनेजाणते सर्वाधिक महत्व देतात ते पोस्ट खात्याला. पोस्टात (Post office) गुंतवणूक केलेली रक्कम ही सुरक्षित राहत असल्याने अनेकांकडून आपली रक्कम पोस्ट खात्यातच गुंतवली जात असते. आगामी काळात तुम्हीदेखील गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा पर्याय तुमच्या डोळ्यासमोर ठेवू शकतात. या योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो. शिवाय यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट ऑफिसमध्ये तसे नाही. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये (small saving schemes) ‘नॅशनल सेव्हींग्स्‌ सर्टीफिकेट’ (NSC) देखील समाविष्ट आहे. पोस्टाच्या या योजनांबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

व्याज दर

पोस्ट ऑफिसची ‘नॅशनल सेव्हींग्स्‌ सर्टीफिकेट’ योजना सध्या वार्षिक 6.8 टक्के व्याजदर देते. व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ केले जात असून ते केवळ मॅच्युरिटीवर दिले जाते. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या अल्प बचत योजनेत 1000 रुपये गुंतवल्यानंतर ही रक्कम पाच वर्षांच्या कालावधीनंतर 1389.49 रुपये होईल.

किती गुंतवणूक शक्य

पोस्ट खात्याच्या या योजनेत किमान 1000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेत 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा ठेवलेली नाही.

खाते कोण उघडू शकते?

या लहान बचत योजनेत, एक प्रौढ आणि तीन प्रौढ व्यक्ती संयुक्तपणे संयुक्त खाते उघडू शकतात. याशिवाय, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालकदेखील योजनेमध्ये खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत, 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन बालक किंवा बालिका स्वतःच्या नावावरही खाते उघडू शकतो.

मॅच्युरिटी

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जमा केलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्व होईल.

कर सूट

या सरकारी योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी दावा केला जाऊ शकतो.

इतर वैशिष्ट्ये

छोट्या बचत योजनेत व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. या योजनेंतर्गत काही विशिष्ट परिस्थितीत पाच वर्षांच्या कालावधीपूर्वीच खाते बंद केले जाऊ शकते. यामध्ये, एकल खातेदाराचा किंवा संयुक्त खात्यात उपस्थित असलेल्या सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केले जाऊ शकते. याशिवाय, न्यायालयाच्या आदेशानुसार खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

संबंधित बातम्या :

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा भाव

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच

BANK HOLIDAY: मार्च महिन्यात ‘या’ तारखांना बँका बंद, वेळेपूर्वीच पूर्ण करा कामं

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...