भाऊ-बहिण दूर असतील तर वाईट वाटून घेवुन नका! या अनोख्या पद्धतीने साजरा करा यंदाचा ‘रक्षाबंधन’

| Updated on: Aug 08, 2022 | 7:37 PM

या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला भेटू शकत नाही का? कुठल्यातरी जबाबदारी मुळे किंवा कामामुळे तुम्ही दूर असाल तर, आम्ही तुम्हाला काही सोप्या युक्त्या सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीला आनंदी करू शकता.

भाऊ-बहिण दूर असतील तर वाईट वाटून घेवुन नका! या अनोख्या पद्धतीने साजरा करा यंदाचा ‘रक्षाबंधन’
Raksha Bandhan
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : भारतात भाऊ-बहिणीच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत हे एक अतूट नाते (An unbreakable relationship) आहे, ज्याची शक्ती रक्षाबंधना निमित्त रेशीमच्या धाग्यात गुंफलेली आपण बघतो. आपण इथे ज्या धाग्याबद्दल बोलत आहोत ती म्हणजे राखी. हिंदू धर्मात राखी साठी एक विशेष सण साजरा केला जातो, ज्याला तुम्ही आणि मी देखील रक्षाबंधन म्हणून ओळखतो. रक्षाबंधनाच्या विधीनुसार बहीण भावाच्या घरी येते आणि त्याला राखी बांधून तिच्या रक्षणाचे वचन (A promise of salvation) घेते. आजही भारतात लोक हा सण जुन्याच पद्धतीने साजरा करतात. तसे, जर भाऊ आणि बहिणी दूर असतील तर, रक्षाबंधनाला एकमेकांची खुपच आठवण होते. एक काळ असा होता जेव्हा दूरवर संपर्क (Contact at a distance) साधणेही अवघड होते, पण आता काळ बदलला आहे. व्हिडिओ कॉल किंवा इतर गोष्टींद्वारे तुम्ही एकमेकांशी सतत बोलू शकता.

सरप्राईज गिफ्ट

एखाद्या खास प्रसंगी भेटवस्तू देणे ही एक सामान्य पद्धत बनली आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला दूर असताना सरप्राईज गिफ्टचे नियेाजन करणे हे थोडेसे अनोखे ठरू शकते. तुमच्या बहिणीसाठी किंवा भावासाठी एक भेटवस्तू निवडा जी त्यांना खरोखर आवडते आणि ती कुरिअर करा. भेटवस्तू मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमच्या दोघांचे नाते अधिक घट्ट होईल.

व्हिडिओ कॉल

आजचे जग डिजिटल जग म्हणूनही ओळखले जाते. जर तुमची बहीण किंवा भाऊ तुमच्या पासून दूर असेल आणि तुम्हाला तिच्यासोबत रक्षाबंधन साजरे करायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलचा पर्याय निवडावा. तुम्ही कितीही दूर असलात तरीही व्हिडिओ कॉल कुठेही आणि कधीही केले जाऊ शकते.म्हणून या रक्षाबंधनाला बहिणीच्या डेाळ्यातील प्रेम व्हिडिओ कॉलने मनात साठवून घ्या.

फेवरेट डिश

रक्षाबंधना निमित्त भाऊ-बहिणी एकत्र जमल्या असतील आणि जेवणाचा बेत नसावा असे हेात नाही. पण, राखीवर तू खूप दूर आहेस आणि तुझ्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद कसा घेणार…असा विचार करू नका. कारण, दूर असूनही, तुम्ही तुमच्या भावाची किंवा बहिणीची आवडती डिश तुम्ही विवीध फूड ॲप्लीकेशद्वारे ऑर्डर करू शकता. यामध्ये तुम्हाला मदत करणाऱ्या अनेक खाद्य कंपन्या आहेत. जर शक्य असेल तर ही युक्ती नक्की करून पहा. आणि आपल्या बहिणीच्या व भावाच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पहा.