BFSI : बँकिंग, फायनेंशिअल क्षेत्रात येणार तेजी, हे शेअर देणार तगडा रिटर्न..

| Updated on: Nov 22, 2022 | 7:06 PM

BFSI : बँकिंग आणि अर्थक्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र येण्याचा अंदाज आहे..

BFSI : बँकिंग, फायनेंशिअल क्षेत्रात येणार तेजी, हे शेअर देणार तगडा रिटर्न..
हा शेअर करेल मालामाल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : बँकिंग आणि फायनेंशिअल सेवा आणि विमा क्षेत्रात (BFSI) तेजीचे संकेत मिळत आहे. आर्थिक वर्ष 2023 (Financial Year) साठी सप्टेंबरच्या तिमाहीतील (September Quarter) आकडे उमेद जागविणारे आहेत. कोविड 19 मधून बाहेर पडून हे सेक्टर फायद्याचा सौदा करुन देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.

बँकिंग आणि फायनेंशिअल क्षेत्रातील एकूणच कामगिरी सुधारली आहे. कंपन्यांच्या एसेट क्वालिटीत सुधारणा झाली आहे. बँका जलदगतीने त्यांची कर्ज वसूली करत आहेत. त्याचा चांगला परिणाम या क्षेत्रावर दिसून येत आहे.

देशात विमा क्षेत्रातही तेजी दिसून येत आहे. विम्यात मोठी वाढ दिसून येत आहे. फायनान्स कंपन्यांनीही फायद्याचे गणित मांडत आहेत. त्यामुळे या तीनही क्षेत्रात सध्या तेजीचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर तुम्हाला नशीब आजमाविता येईल. या सेक्टरमध्ये येत्या काही दिवसात मोठा फायदा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यातील काही स्टॉक निवडून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याचा समावेश करु शकता.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने याविषयीची एक यादी प्रसिद्ध केली आहे. सध्या बँकिंग क्षेत्र उत्तम कामगिरी करत आहे. बाजारात चढ उतार होतच असतात. पण त्यातून कमाईची संधी शोधणे हे काम अवघड आहे.

डाटा विश्लेषणाद्वारे ICICI सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांसाठी बँकिंग, विमा आणि फायनेंशिअल कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. अर्थात गुंतवणुकीपूर्वी अभ्यास, वित्तीय सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

ICICI सिक्‍योरिटीजने या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
Kotak Mahindra Bank (BUY, CMP: Rs1,960)
HDFC Life Insurance (BUY, CMP: Rs530)
ICICI Prudential Insurance (BUY, CMP: Rs470)
ICICI Lombard General Insurance (BUY, CMP: Rs1,137)
AU Small Finance Bank (HOLD, CMP: Rs612)
IDFC First Bank (HOLD, CMP: Rs56)
Piramal Enterprises (BUY, CMP: Rs789)
Credit Access Grameen (BUY, CMP: Rs967)
Computer Age Management Services (BUY, CMP: Rs2,295)
JM Financial (BUY, CMP: Rs73)

ब्रोकरेज हाऊस एमके ग्‍लोबलने या बँका, कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. SBI, ICICI Bank, BOB, Indian Bank, Axis Bank, CUBK, Federal Bank, Karur Vyasa Bank और Equitas Small Finance Bank या शेअरचा त्यामध्ये समावेश आहे.