ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ योजना आहेत वरदान, हमखास चांगल्या परताव्याची गॅरंटी

| Updated on: Mar 31, 2022 | 5:40 AM

अनेक जणांना निवृत्तीनंतर चांगली रक्कम हातात येते. अशावेळी कुठे गुंतवणूक करावी त्यामुळे चांगला परतावा मिळू शकतो? चांगला परतावा देणाऱ्या योजनांची माहिती नसल्यानं गुंतवणूक करताना बऱ्याचदा गोंधळ उडतो. ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक नेमकी कुठे करावी याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजना आहेत वरदान, हमखास चांगल्या परताव्याची गॅरंटी
Follow us on

पुण्याचे अशोक देशमुख नुकतेच निवृत्त (Retired) झाले आहेत. ते पेन्शनच्या (Pension) कक्षेत येत नाहीत. त्यांना सध्या ग्रॅच्युइटी आणि पीएफच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळाली आहे. त्यांना 40 लाख रुपयांची गुंतवणूक (Investment) करावयाची आहे. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच उदरनिर्वाह करायचा आहे. परंतु गुंतवणूक कुठे करावी ? याबाबत त्यांचा गोंधळ उडालाय. ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी सरकारने काही विशेष योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो. परंतु या योजनांचा गुंतवणुकीवरील व्याजदर झपाट्याने खाली येत असल्याने आता विशेष योजना फायदेशीर नाहीत अशा स्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत कायम राहील ते पाहुयात. अशोक देशमुख आता निवृत्त आहेत, त्यांनी मोठी जोखीम घेणं टाळले पाहिजे. खात्रीशीर आणि सुरक्षित परताव्यासाठी वय वंदना आणि फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड्स यात गुंतवणूक करावी, असा सल्ला कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी दिलाय.

वय वंदना योजना

अशोक देशमुख वय वंदनामध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. सरकारची ही 10 वर्षांची पेन्शन योजना एलआयसीच्या माध्यमातून चालवली जात आहे. सध्या त्यावर 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. जर अशोक देशमुख यांनी या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना 10 वर्षांसाठी 7.4 टक्के दरानं व्याज मिळेल. नियमित पेन्शनसाठी त्यांना या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी. यानंतर ते मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडू शकतात. जर त्यांनी दरमहा पेन्शनचा पर्याय निवडल्यास 9250 रुपये मिळतात, त्रैमासिक पर्याय निवडल्यास 27,750 रु. सहामाही पेन्शच्या पर्यायात 55,500रु. आणि वार्षिक पेन्शनच्या पर्यायात 1,11,000 रु. मिळतील. 31 मार्च 2023 पर्यंत वय वंदना योजनेत एखादी व्यक्ती कमाल 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते.

फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड योजना

कोरोनाकाळात आरबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड ही योजना सुरू केलीये. या योजनेवर FD म्हणजे मुदत ठेव योजना आणि RD म्हणजे आवर्ती ठेव योजना यांच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा चांगला पर्याय आहे. या योजनेला सरकारी हमी असल्यानं 7 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. या गुंतवणुकीचा व्याजदर NSC म्हणजे राष्ट्रीय बचत पत्राशी जोडला गेला आहे. ही योजना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याने, त्यांना NSCच्या तुलनेत 35 बेसिस पॉइंट अधिक व्याज दिले जाते. सध्या 7.15 टक्के व्याजदर आहे. या गुंतवणुकीवर सहामाही व्याज दिले जाते. त्यामुळे अशोक देशमुख यांनी त्यांच्या एकूण रकमेपैकी 10 लाख रुपये फ्लोटिंग रेट सेविंग बाँडमध्ये गुंतवण्यास हरकत नाही.

संबंधित बातम्या

Post Info: एका क्लिकवर सर्वकाही ! विमा हप्त्याच्या आकडेमोडीपासून ते व्याज दरांपर्यंत या अॅपवर ए टू झेड माहिती

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला

FD मध्ये गुंतवणूक कारयचीये? तर जाणून घ्या ‘या’ पाच परदेशी बँकांबाबत, ज्या गुंतवणुकीवर देतात सर्वोत्तम व्याजदर