FD मध्ये गुंतवणूक कारयचीये? तर जाणून घ्या ‘या’ पाच परदेशी बँकांबाबत, ज्या गुंतवणुकीवर देतात सर्वोत्तम व्याजदर

जर तुम्ही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा (Investment) प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासमोर एफडी फिक्स्ड डिपॉझिटचा (Fixed Deposit) सर्वोत्तम पर्याय असतो. अनेक जण आपली गुंतवणूक एखाद्या बँकेच्या (BANK) फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवतात.

FD मध्ये गुंतवणूक कारयचीये? तर जाणून घ्या 'या' पाच परदेशी बँकांबाबत, ज्या गुंतवणुकीवर देतात सर्वोत्तम व्याजदर
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 9:56 AM

मुंबई : जर तुम्ही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा (Investment) प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासमोर एफडी फिक्स्ड डिपॉझिटचा (Fixed Deposit) सर्वोत्तम पर्याय असतो. अनेक जण आपली गुंतवणूक एखाद्या बँकेच्या (BANK) फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवतात. फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची रक्कम सुरक्षीत राहाते. बँक आणि पोस्टाच्या योजनांमध्ये शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडच्या तुलनेत रिस्क कमी असते. आता तर अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडीची देखील योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तुम्ही पैसा गुंतवल्यास इनकम टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला गुंतवणुकीवर सूट मिळते. मात्र तुम्ही जेव्हा एफडीमध्ये पैसे गुंतवतात तेव्हा हे देखील पहाणे आवश्यक असते की तुम्हाला गुंतवणुकीवर व्याज किती मिळणार? कारण जेवढे जास्त व्याज तेवढाच जास्त परतावा त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी किमान चार ते पाच बँकेत व्याजदराची चौकशी करावी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांची माहिती सांगणार आहोत, ज्या बँकांचा व्याजदर सर्वोत्तम आहे.

  1. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक – स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक सध्या आपल्या ग्राहकांना एफडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देत आहे. बँकेकडून ग्राहकांना वार्षिक आधाराव एफडीवर 5.25 ते 5.30 टक्के व्याज देण्यात येत आहे.
  2. सीटी बँक – सीटी बँकेकडून एफडीवर ग्राहकांना चार टक्के दराने व्याज देण्यात येते आहे. जर एफडी दीर्घ मुदतीसाठी केली असेल तर आणखी चांगले व्याज बँकेच्या वतीने मिळू शकते.
  3. एचएसबीसी बँक – एचएसबीसी बँकेकडून आपल्या ग्राहकांना एक ते दोन वर्षांच्या ठेवीवर 3.5 ते 3.10 टक्के व्याज दिले जाते, तर त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी एफडी केली असल्यास बँकेकडून एफडीवर चार टक्के दराने व्याज देण्यात येते.
  4. ड्यूश बँक – ड्यूश बँकेंकडून सध्या आपल्या ग्राहकांना एफडीवर एक ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी 3.85 ते 5 टक्के व्याज देण्यात येत आहे. त्यापेक्षा अधिक कालवधीची एफडी असेल तर त्याच्यावर 6.25 टक्के दराने व्याज देण्यात येते. तर डीबीएस बँकेकडून आपल्या ग्राहकांना एफडीवर पाच ते 5.25 टक्क्यांनी व्याज देण्यात येत आहे.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.