Aadhaar Pan Card : आधार-पॅन लिंक केले का? एका मिनिटात घरबसल्या चेक करा स्टेटस

| Updated on: Mar 24, 2023 | 12:36 PM

Aadhaar Pan Card : आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झाले आहे की नाही, याविषयी तुम्ही साशंक असाल तर तुम्हाला काही मिनिटातच तुमची शंका दूर करता येईल. हे काम घरबसल्या करता येईल.

Aadhaar Pan Card : आधार-पॅन लिंक केले का? एका मिनिटात घरबसल्या चेक करा स्टेटस
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिकिंग करणे अनिवार्य केले आहे. करदात्यांना त्यांच्या परमनन्ट अकाऊंट नंबरवरुन (Pan Card) आधार लिंक करण्याचा यापूर्वीच सूचना देण्यात आली होती. हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची डेडलाईन, अंतिम मुदत 31 मार्च 2023 ही आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर , पॅन कार्ड रद्द होईल. त्याचा काहीच उपयोग करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बँकिंग, म्युच्युअल फंड, शेअर बाजाराशी संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. बीएसई, एनएसई तुम्हाला व्यवहार करु देणार नाही. म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांना थेट निर्बंध येतील.

ज्या करदात्यांनी आतापर्यंत त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्यांना सध्या 1000 रुपयांचे शुल्क आकारुन दोन्ही कार्ड लिंक करता येतील. दंड न आकारता ही डेडलाईन 30 जून 2022 ही होती. जर तुम्ही पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर आता 31 मार्च 2023 या अंतिम मुदतीपूर्वी ही जोडणी करुन घ्या.

तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.

हे सुद्धा वाचा
  1. स्टेप 1: सर्वात अगोदर, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल
  2. स्टेप 2: याशिवाय तुम्हाला 10 आकड्यांचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावे लागेल.
  3. स्टेप 3: त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका, त्यानंतर व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट नसेल तर तुम्हाला लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  4. तुमचे पॅन-आधार स्टेटस तपासण्याची दुसरी पद्धत एसएमएस आहे. एसएमएसच्या मदतीने पॅन कार्ड-आधार कार्ड लिकिंगचे स्टेट्स चेक करता येते. त्यासाठी तुम्हाला 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
  5. तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला मॅसेज पद्धतीने UIDPAN टाईप केल्यानंतर स्पेस सोडावी लागेल. त्यानंतर तुमच्या 12 अंकी आधार कार्ड टाईप करावा लागेल. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाईप करावा लागेल. त्यानंतर 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवा.
  6. एसएमएस फॉर्मेट असा असेल : UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन कार्ड क्रमांक>