Gold Silver Price Today News | सोने चमकले, चांदीतही किंचित दरवाढ, काय आहेत आजचे भाव ?

| Updated on: Aug 24, 2022 | 1:01 PM

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी वाढ झाली. iगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीत सातत्याने घसरण सुरु होती.  सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण झाली होती.  पाहुयात आजचा भाव

Gold Silver Price Today News | सोने चमकले, चांदीतही किंचित दरवाढ, काय आहेत आजचे भाव ?
आजचे सोने चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Gold Silver Price Today News | बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today News) वाढ झाली. गेल्या दोन दिवसांपासून सोने उतरणीला लागले होते. तर चांदीही फिक्की पडली होती. सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांपर्यंत प्रति 10 ग्रॅम घसरण झाली होती. तर मंगळवारी चांदीच्या किंमतीही 400 रुपयांनी घसरल्या होत्या. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Reserve) व्याजदरात वाढ केलेली आहे आणि पुढील महिन्यात त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात (Repo Rate) वाढ केलेली असून महागाई अटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक पुन्हा दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीचे दर मध्यंतरी 50 हजारांच्या ही खाली उतरले होते. त्यानंतर गेल्या 15 दिवसांत हे दर वधरले आहेत.

भावात वाढ

मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरला आणि 10 ग्रॅमसाठी 47,000 रुपयांवर स्थिरावला. बुधवारी सोन्यात 250 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 47,250 रुपये झाला. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी रविवारी 52,150 रुपये दर होता सोमवारी हा दर 10 ग्रॅमसाठी 220 रुपयांनी घसरून 51,930 रुपये झाला. तर मंगळवारी 10 ग्रॅमसाठी 700 रुपयांची घसरण होत हा भाव 51,230 रुपये झाला होता. बुधवारी हाच भाव 51,550 रुपये झाला. चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. मंगळवारी भाव 800 रुपयांनी घसरुन 54,900 रुपये किलो झाला.बुधवारी चांदीत 100 रुपयांची वाढ झाली.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,250 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,550 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 552 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे सुद्धा वाचा

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.