Gold Silver Price Today News | आज सोने खरेदीदारांसाठी खुषखबर आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. सोमवारी सोन्याचे दर 200 रुपयांनी घसरले होते. मंगळवारी सोन्याच्या दरात (Gold Silver Price Today News) 600 रुपयांची घट नोंदवण्यात आली. दोन दिवसांत सोन्यात प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत ही फरक पडला आहे. सोन्याच्या किंमती घसरल्याने जागतिक मंदीच्या चर्चांचा सोन्यावर फार मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. युरोपीयन राष्ट्रे (European Countries) सध्या मंदी आणि बेरोजगारीचा सामना करत असून या ठिकाणच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याच्या उपाययोजना आरंभल्या आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Reserve) व्याजदरात वाढ केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात वाढ केलेली आहे.