AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | आजचा मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत सोन्या-चांदीचे दर?

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी, 22 ऑगस्ट रोजी घसरण झाली. तर चांदीची चमक ही कमी झाली. पाहुयात आजचा भाव

Gold Silver Price Today News | आजचा मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत सोन्या-चांदीचे दर?
आज सोन्यासारखा मुहुर्तImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 22, 2022 | 1:55 PM
Share

Gold Silver Price Today News | आजचा मुहुर्त सोन्याचा आहे. सोमवारी, 22 ऑगस्ट रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today News) घसरण झाली. दोन दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर होते. किंमतीत फारसा बदल झाला नव्हता. सोमवारी मात्र सोन्याने खरेदीदारांसाठी चांगली बातमी दिली. सोन्याच्या दरामध्ये घसरण नोंदवण्यात आली तर चांदीच्या किंमतीत ही फरक फडला आहे. रविवारपेक्षा या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमती घसरल्याने जागतिक मंदीच्या चर्चांचा सोन्यावर फार मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. युरोपीयन राष्ट्रे (European Countries) सध्या मंदी आणि बेरोजगारीचा सामना करत असून या ठिकाणच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याच्या उपाययोजना आरंभल्या आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Reserve) व्याजदरात वाढ केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात वाढ केलेली आहे.

चला खरेदीला

रविवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,800 रुपये होता, सोमवारी हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 200 रपयांनी घसरल्या आणि हा दर 47,600 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, 10 ग्रॅम सोन्यासाठी रविवारी 52,150 रुपये दर होता आज हा दर 10 ग्रॅमसाठी 220 रुपयांनी घसरून 51,930 रुपये झाला. चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. तो 400 रुपयांनी घसरुन सोमवारी 55,200 रुपये किलो झाला.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,600 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 556 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.