AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Gold- Silver Rate : गुंतवणुकीची सुवर्णसंधी, सोन्याच्या भाववाढीला ब्रेक, चांदीही घसरली

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold- Silver Rate) तेजी दिसून येत आहे. मात्र सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून, सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत.

Today Gold- Silver Rate : गुंतवणुकीची सुवर्णसंधी, सोन्याच्या भाववाढीला ब्रेक, चांदीही घसरली
सोन्याचे आजचे दर Image Credit source: TV9
| Updated on: Apr 20, 2022 | 1:34 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold- Silver Rate) तेजी दिसून येत आहे. मात्र सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून, सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत. कमॉडिटी एक्सचेंजनुसार (MCX) सोन्याच्या (Gold) दरात आज 0.54 टक्क्यांची घसरण झाली आहे. नव्या दरानुसार आज बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 0.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर घसरणीसह 49,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहेत. चांदीचे भाव देखील कमी झाले असून, आज चांदीचे दर प्रति किलो 69,300 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी राज्यात 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54390 इतके होते, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 49860 रुपये प्रति तोळा होते. आंतराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे. त्याचा परिणाम हा भारतीय सराफा बाजारावर होताना दिसत असून, भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीचे दर अस्थिर होत आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

  1. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार राजधानी मुंबईमध्ये आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 49,150 रुपये प्रति तोळा आहे, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत.
  2. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49,180 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्यासाठी प्रति तोळ्यामागे 53,650 रुपये मोजावे लागत आहेत.
  3. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49 300 असून, 24 कॅरट सोन्याचा दर हा 53 हजार आठशे रुपये एवढा आहे
  4. तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 49200 असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप