Today gold, silver rates : रेपो रेट वाढीनंतरही सोन्याच्या दरात तेजी सुरूच; चांदीही वधारली, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

| Updated on: Jun 17, 2022 | 11:41 AM

आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील भाव .

Today gold, silver rates : रेपो रेट वाढीनंतरही सोन्याच्या दरात तेजी सुरूच; चांदीही वधारली, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

मुंबई : पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात (Gold-silver prices) तेजी दिसून येत आहे. आज 22 कॅरट सोन्याचा (Gold) दर प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47550 इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52100 इतका आहे, गुरुवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51870 इतका होता. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात 230 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये (silver prices) देखील तेजी दिसून येत आहे. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 61,150 रुपये इतके होते. शुक्रवारी चांदीचे दर प्रति किलो 61,500 रुपयांवर पोहोचले आहेत. आज चांदीच्या दरात किलो मागे 350 रुपयांची वाढ पहायला मिळत आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47750 रुपये एवढे आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,100 इतके आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,820 रुपये एवढे आहेत, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,150 रुपये एवढे आहेत. नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,820 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,150 रुपये एवढे आहेत. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,820 रुपये इतके आहेत, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,150 रुपये एवढे आहेत. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47770 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,125 रुपये एवढे आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रमुख महानगरातील भाव

  1. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,780 रुपये इतके आहेत, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,120 रुपये एवढे आहेत.
  2. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,750 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,100 रुपये इतके आहेत.
  3. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,850 रुपये आहेत तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,180 रुपये एवढे आहेत.
  4. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47750 रुपये एवढे आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,100 रुपये इतके आहेत.
  5. तर आज चांदीचा देखील भाव वधारला असून, चांदीचे दर प्रति किलो 61,500 रुपयांवर पोहोचले आहेत.