AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाहीतर दुप्पट मिळवा पैसा, फक्त वापरा ही ट्रीक

Ticket Booking Rule: तुम्ही डबल रिफंडसाठी पात्र तेव्हाच ठरणार जेव्हा चार्ट लागल्यानंतर तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही. जर चार्ट तयार करताना तुमचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी झाले तर दुप्पट पैसे मिळणार नाही. ही ऑफर फक्त वेटींग तिकिटांसाठी आहे.

रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाहीतर दुप्पट मिळवा पैसा, फक्त वापरा ही ट्रीक
ट्रेन तिकीट
| Updated on: Aug 04, 2024 | 2:45 PM
Share

Ticket Booking Rule: भारतीय रेल्वेतून लाखो लोक नियमित प्रवास करतात. सर्वांचे प्राधान्य आरक्षण तिकीट करुन प्रवास करण्याचे असते. परंतु अनेकदा तिकीट कन्फर्म होत नाही. त्यावेळी ऑनलाईन तिकीट असेल तर त्याचे पैसे खात्यात परत येतात. परंतु तिकीट जर रेल्वेच्या काऊंटरवरुन काढले असेल तर त्याच ठिकाणी जाऊन रद्द करावे लागते. त्यावेळी काही पैसेही कापले जातात. परंतु तुम्हाला म्हटले रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाही तर दुप्पट पैसे मिळतील? तर खरे वाटणार नाही. परंतु एक अशी ट्रिक आहे, तिचा वापर केल्यावर तिकीट कन्फर्म मिळणार आहे. तिकीट कन्फर्म न झाल्यास तुम्हाला दुप्पट पैसे परत मिळतील.

असे करा तिकीट बुक

ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला गोआयबीबी वेबसाईट किंवा अ‍ॅपचा वापर करावा लागतो. त्या अ‍ॅप किंवा वेबसाईटवरुन वेटींग तिकीट बुक करताना ‘गोकन्फर्म्ड ट्रिप’ तिकिटाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तिकीट कन्फर्म होण्याच्या संधी वाढणार आहे. चार्ट तयार झाल्यानंतर वेटींग तिकीट कन्फर्म झाले नाही तर तुम्हाला दुप्पट पैसे परत मिळणार आहे. कंपनीकडून ही दुप्पट पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

किती पैसे मिळणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे तिकीट बुक करताना डेबिट झालेल्या खात्यावर तिकिटाचे भाडे आयआरसीटीसीकडून परत केले जाईल. उर्वरित रक्कम ‘ट्रॅव्हल व्हाउचर’च्या स्वरूपात परत केली जाईल. हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवासी Goibibo प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली इतर कोणतीही वाहतूक जसे विमान, बस, ट्रेन किंवा कॅब बुक करण्यासाठी वापरू शकतात.

रेल्वे तिकीट बुकींग ऑफर

केव्हा दुप्पट पैसे मिळणार नाही?

कंपनीने म्हटले आहे की, तुम्ही डबल रिफंडसाठी पात्र तेव्हाच ठरणार जेव्हा चार्ट लागल्यानंतर तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही. जर चार्ट तयार करताना तुमचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी झाले तर दुप्पट पैसे मिळणार नाही. ही ऑफर फक्त वेटींग तिकिटांसाठी आहे. तसेच गोआयबीबो प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक केल्यावर निवड श्रेणीसाठीच लागू आहे. जास्तीत जास्त 3,000 रुपये परत मिळणार आहे. बल्क बुकींग करताना काही तिकीट कन्फर्म झाले तर दुप्पट रिफंड मिळणार नाही.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.