पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजनेत दर महिन्याला फक्त इतकी गुंतवणूक करा, 5 वर्षांत तब्बल 20 लाख मिळवा

वाढत्या महागाईत पुढच्या ५ वर्षांत २० लाख रुपये जमवायचे आहेत? तर पोस्ट ऑफिसची ५ वर्षांची Recurring Deposit (RD) योजना एक चांगला पर्याय आहे.चला जाणून घेऊया, या सरकारी योजनेत दर महिन्याला किती बचत कसं बचत करु शकता ?

पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजनेत दर महिन्याला फक्त इतकी गुंतवणूक करा, 5 वर्षांत तब्बल 20 लाख मिळवा
post office scheme
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 2:51 PM

आजच्या महागाईच्या युगात आर्थिक भविष्याची तयारी करणं खूप आवश्यक झालं आहे. घर, शिक्षण, लग्न किंवा इतर महत्त्वाच्या गरजांसाठी निधी साठवण्याचं योग्य नियोजन हवं. जर तुमचंही लक्ष्य पुढच्या ५ वर्षांत सुमारे २० लाख रुपये जमवण्याचं असेल, तर पोस्ट ऑफिसची एक शासकीय योजना तुम्हाला मोठी मदत करू शकते.

ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची Recurring Deposit (RD) योजना. ही एक अशी बचत योजना आहे जिथे तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करता. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून, ठराविक व्याजदरानुसार तुम्हाला मुदत पूर्ण झाल्यावर तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेलं व्याज एकत्र मिळतं.

पोस्ट ऑफिस RD सध्या ५ वर्षांसाठी ६.७% वार्षिक व्याज देते. जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला ₹२८,१०० या योजनेत जमा केलं, तर ५ वर्षांच्या अखेरीस त्याची एकूण गुंतवणूक ₹१६.८६ लाख इतकी होईल. यावर मिळणाऱ्या व्याजासह मॅच्युरिटी रक्कम सुमारे ₹२० लाखांच्या घरात म्हणजेच ₹२०,०५,३८२ इतकी होऊ शकते.

Recurring Deposit (RD) योजनेचे फायदे

या योजनेचे सर्वात मोठे फायदे म्हणजे सुरक्षा आणि निश्चित परतावा. पोस्ट ऑफिस RD ही भारत सरकारद्वारे समर्थित योजना असल्यामुळे गुंतवलेले पैसे पूर्णतः सुरक्षित राहतात. शिवाय, एकदा सुरू केल्यावर व्याज दर पाच वर्षांसाठी ठरलेला राहतो, त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा काहीही परिणाम होत नाही.

या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे शिस्तबद्ध बचतीची सवय लागते. दर महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढावी लागते, त्यामुळे वेळोवेळी पैसे साठत जातात आणि मोठ्या रकमेचा निधी तयार होतो. हे खाते कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अगदी सहज उघडता येतं.

थोडक्यात, जर तुम्हाला सुरक्षित आणि ठराविक परतावा देणारी योजना हवी असेल, आणि तुम्ही दर महिन्याला नियमितपणे बचत करू शकत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही RD योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.