म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच

| Updated on: Feb 26, 2022 | 5:30 AM

म्युच्युअल फंडच्या बाजारात कोणता म्युच्युअल फंड खरेदी करावा यावरून गोंधळ उडतो. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, बॅलेन्स फंड यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांचा उडणारा गोंधळ पाहूनच मल्टिकॅप फंड्सच्या (Multicap funds) पर्यायाची सुविधा देण्यात आलीये.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक
Follow us on

मुंबई : म्युच्युअल फंडद्वारे (Mutual funds) शेअर बाजारात (Stock market) गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे, असं नाशिकमध्ये राहणाऱ्या विद्याला एवढं तर नक्की समजलंय. मात्र, म्युच्युअल फंडच्या बाजारात कोणता म्युच्युअल फंड खरेदी करावा याचा गोंधळ अद्याप कायम आहे. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, बॅलेन्स फंड यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांचा उडणारा गोंधळ पाहूनच मल्टिकॅप फंड्सच्या (Multicap funds) पर्यायाची सुविधा देण्यात आलीये. वैविध्यपूर्ण बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मल्टिकॅप फंड. म्हणजेच एकाच फंडात गुंतवणूक केल्यानंतरही अनेक कंपन्यात गुंतवणूक केल्याचा फायदा मिळतो. मल्टिकॅप फंड लवचिक आणि सोयीस्कर असल्यानं गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरले आहेत. याचं मुख्य वैशिष्ट म्हणजे तुमच्या पसंतीनुसार कोणत्याही गुणोत्तराच्या प्रमाणात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास स्वतंत्र असते.

नवे नियम समजून घ्या

सेबीच्या अहवालानुसार या अगोदर गुंतवणूकदार 70 ते 80 टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कपंनीमध्ये करत होते. त्यामुळे दुसऱ्या प्रकारात कमी गुंतवणूक होत होती. मार्केट कॅपची मर्यादा नसल्यानं गुंतवणूकदारही आकर्षित होत नव्हते. त्यामुळे सेबीनं मल्टिकॅप फंड्सच्या गुंतवणुकीवर अंकुश लावलाय. या नियमाच्या अंमबजावणीला जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. सेबीच्या नियमानुसार फंड हाऊसला आता 25 टक्के हिस्सा लार्ज, स्मॉल आणि मिड कॅप या तीन फंडात गुंतववावा लागतो. त्यानंतर उर्वरित 50 टक्के गुंतवणूक फंड व्यवस्थापक त्याच्या पसंतीनुसार कोणत्याही फंडात करतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक फंड हाऊसनी मल्टिकॅप फंड लॉंच केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढलाय.

पोर्टफोलिओ व्यापक होण्यास मदत

RSM चे फाउंडर सुरेश सुराणा म्हणतात, ”मल्टिकॅप फंड लवचिक असल्यानं चांगला फायदा होत होता. आता नियमात बदल केल्यानं लवचिकता कमी झालीये. तरीही दुसऱ्या फंड्सच्या तुलनेत मल्टिकॅप फंड वैविध्यपूर्ण आणि लवचिक आहेत. “ज्याप्रकारे सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये न ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, डेट आणि अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मल्टिकॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानं तुमच्या पोर्टफोलिओ व्यापक होतो. विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक झाल्यानं मोठा फायदा मिळतो.

संबंधित बातम्या

‘एनएसई’च्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांच्या सल्लागाराला सीबीआयकडून अटक; चौकशीत धक्कादायक खुलाशांची शक्यता

पुढच्या दोन वर्षांत लग्न करताय? रशिया-युक्रेन युद्धाचा तुम्हालाही फटका बसणार…

Russia Ukraine crisis : भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने