मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचं काय होतं? वाचा सरकारचे नियम

आजच्या डिजिटल युगात आधार आणि पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रं बनले आहेत. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर या डॉक्युमेंट्सचं काय होतं, ते आपोआप रद्द होतात का? यासाठी सरकारचे स्पष्ट नियम आहेत. चला, ते जाणून घेऊया.

मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचं काय होतं? वाचा सरकारचे नियम
aadhar card pan card
| Edited By: | Updated on: Jul 02, 2025 | 2:35 PM

आजच्या काळात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं मानली जातात. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील अनेक कामांसाठी यांची गरज भासते. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आधार किंवा पॅन कार्ड आपोआप रद्द होतात का, की यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते? या महत्त्वाच्या मुद्द्यावर अनेकांना माहिती नसते. चला तर मग, जाणून घेऊया मृत्यूनंतर आधार आणि पॅनबाबत काय नियम आहेत.

मृत्यूनंतर आधार कार्डचं काय?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधार कार्ड आपोआप रद्द केलं जात नाही. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी त्याचा आधार कार्ड ॲक्टिव्हच राहतो. त्यामुळे तो कोणत्याही चुकीच्या वापरासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

UIDAI कडे सध्या मृत व्यक्तीचं आधार कार्ड पूर्णपणे रद्द करण्यासाठी कोणताही अधिकृत प्रोटोकॉल किंवा सुविधा उपलब्ध नाही. मात्र, आधार लॉक करण्याची सुविधा मात्र दिली आहे, ज्यामुळे आधारचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळता येतो.

कसा कराल आधार लॉक?

1. UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा.

2. ‘My Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.

3. त्यानंतर ‘Aadhaar Services’ या टॅबमध्ये जाऊन ‘Lock/Unlock Biometrics’ या पर्यायावर क्लिक करा.

4. तिथे आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

5. नंतर मिळणाऱ्या OTP चा वापर करून लॉगिन करा.

6. त्यानंतर ‘Lock Biometrics’ पर्याय निवडा.

7. हे सर्व केल्यानंतर मृत व्यक्तीचं आधार कार्ड लॉक केलं जाऊ शकतं. यामुळे ते कोणत्याही बायोमेट्रिक व्यवहारासाठी वापरता येत नाही.

पॅन कार्डबाबत काय नियम?

पॅन कार्ड देखील एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. बँकेत खाते उघडताना, आयकर विवरण भरताना, आर्थिक व्यवहार करताना त्याची गरज भासते. नियमांनुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पॅन कार्ड परत करून रद्द करणं आवश्यक असतं.

पॅन कार्ड रद्द कसं करायचं?

1. सर्वप्रथम, मृत व्यक्तीच्या नावे असलेली बँक खाती, आर्थिक गुंतवणूक व अन्य व्यवहार आपल्या नावे ट्रान्सफर करून घ्या.

2. त्यानंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

3. त्यांना मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रं सादर करून पॅन कार्ड रद्द करण्याची विनंती करा.