Aadhaar Update | आधारच्या फोटोने केला हिरमोड? असा बदला झटपट

| Updated on: Jan 09, 2024 | 10:53 AM

Aadhaar Update | आधार कार्ड आज अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. तर आर्थिक कामासाठी पण आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो असतो. तुम्हाला तुमचा फोटो आवडला नसेल. तो फोटो व्यवस्थित वाटत नसेल तर हा फोटो तुम्हाला झटपट बदलता येईल. त्यासाठी इतका येईल खर्च ...

Aadhaar Update | आधारच्या फोटोने केला हिरमोड? असा बदला झटपट
Follow us on

नवी दिल्ली | 9 जानेवारी 2024 : आधार कार्ड ही आता भारतीयांची ओळख झाली आहे. तो महत्वाचा दस्तावेज आहे. केवळ ओळखपत्रच नाही तर अनेक महत्वाच्या कामासाठी आधार कार्डच द्यावे लागते. आधार कार्ड अथवा मतदान कार्ड तयार करताना अनेकदा त्यावरील फोटो अनेकांना आवडत नाही. आलेला फोटो काळपट अथवा व्यवस्थित दिसत नाही. ज्या व्यक्तीचे आधार कार्ड आहे, हे त्याचेच आहे का? अशी शंका येते. अनेकांना हा फोटो बदलायचा असतो. पण त्यांना तो कसा बदलावा हे माहिती नसते. त्यासाठी किती शुल्क आकारल्या जाते हे माहिती नसते.

फोटो बदलण्याची ऑनलाईन नाही सुविधा

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना फोटो बदल करण्याची सुविधा दिली आहे. पण ही सुविधा ऑनलाईन नाही. त्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर तुम्हाला धाव घ्यावी लागेल. तुमच्या जवळ कोणते आधार केंद्र आहे, हे तपासण्यासाठी appoinments.uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन केंद्राचे नाव जाणून घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

घरबसल्या करा हे बदल

जर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, ई-मेल आयडी हे बदलवायचे असतील तर त्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. UIDAI ने त्यासाठी खास सुविधा दिली आहे. UIDAI च्या संकेतस्थळावरुन हे अपडेट तुम्ही घरबसल्या करु शकता. पण जी कामे करण्यासाठी बायोमेट्रिकची गरज असते. त्याठिकाणी तुमच्या बोटांच्या ठशांची गरज असते. अशा कामांसाठी Aadhaar Seva Kendra वर जावे लागते.

या स्टेप्स करा फॉलो

  • UIDAI ची अधिकृत पोर्टल uidai.gov.in वर जा. त्यानंतर आधार नावनोदणी अर्ज डाऊनलोड करा
  • हा अर्ज घरीच भरा. हा अर्ज भरल्यानंतर जवळच्याच आधार केंद्रावर जा
  • आधार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुमच्या Biometric Details अपडेट केले जाईल
  • नवीन फोटो अपडेट केल्यानंतर त्यासाठी काही शुल्क अदा करावे लागेल
  • फोटो अपडेट करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक स्लिप मिळेल

किती लागेल शुल्क

आधार केंद्रावर गेल्यावर, फोटो बदलण्यासाठी अर्ज भरुन द्यावा लागेल. या अर्जावर सविस्तर माहिती भरा. आधार केंद्रावर तुमचे छायाचित्र घेण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना अपडेट रिक्वेस्ट क्रमांकाची स्लिप देण्यात येईल. या स्लिपमध्ये तुम्हाला URN मिळेल. म्हणजे तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. त्याआधारे तुम्ही UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार अपडेट झाले की नाही, याची माहिती मिळेल.या कामासाठी 100 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. आधार कार्डची डिजिटल कॉपी तुम्हाला uidai.gov.in वरून सहज डाऊनलोड करता येईल.