Torn Currency : फाटक्या नोटांचे कशाला टेन्शन, बँकांना नोटा द्यावा लागतात बदलवून, RBI ने तयार केला नियम

| Updated on: Apr 28, 2023 | 12:04 PM

Torn Currency : आता फाटक्या नोटांचे टेन्शन घेऊ नका, बँकांना या खराब, मळक्या नोटा बदलवून द्यावा लागतात, याविषयीचा नियम माहिती आहे का

Torn Currency : फाटक्या नोटांचे कशाला टेन्शन, बँकांना नोटा द्यावा लागतात बदलवून, RBI ने तयार केला नियम
Follow us on

नवी दिल्ली : अनेकदा अति वापरामुळे नोटा खराब, मळक्या होतात. तर काही वेळा त्या फाटतात. एकवेळ अशी येते की, या नोटा वापरताच येत नाही. पण नोटांच्या बंडलमध्ये, गड्डीमध्ये या नोटा बेमालूमपणे लपविल्या जातात. या नोटा हातात आल्यावर डोक्याला ताप होतो. कारण या नोटा सहजासहजी कोणी घेत नाही. त्याचे मू्ल्य कायम असते, पण नोटा फाटल्याने (Torn Notes) त्या कोणीच घेत नाहीत. मग या नोटांचे आता करावं तरी काय, त्याचा आता काहीच उपयोग नाही का? या नोटांविषयी काही तरी नियम असतीलच की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयी काही नियम तयार केले आहेत..

तर करा तक्रार
जर तुमच्याकडे फाटक्या, जीर्ण, मळक्या, जुन्या नोटा असतील तर या नोटा तुम्हाला बँकेत जाऊन बदलविता येतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर बँक नोट बदलविण्यास नकार देत असेल तर त्या बँक आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते. बँकेद्वारे फाटक्या नोटा बदलवून मिळत नसतील, तर ग्राहकांना आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करता येते.

इतक्या नोटा बदलविता येतात
केंद्रीय बँकेने याविषयीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, फाटक्या नोटा बदलण्यासाठी एक निश्चित कालावधी असतो. एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलवू शकते. पण त्यांची एकूण किंमत 5 हजार रुपयांहून अधिक नको. तर पूर्णपणे जळालेली नोट, फाटक्या नोटा बदलविण्यात येणार नाही. या नोटा तुम्हाला थेट आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतात.

हे सुद्धा वाचा

नियम काय सांगतो
फाटक्या नोटा बदलविताना त्या किती जीर्ण, फाटक्या आहेत, त्यावर रक्कम निश्चित करण्यात येते. 2000 रुपयांची नोट 88 वर्ग सेंटीमीटर असेल तर त्याची पूर्ण किंमत मिळते. तर 44 वर्ग सेंटीमीटर नोट असेल तर अर्धी रक्कम देण्यात येते. जर 200 रुपयांच्या फाटक्या नोटेचा 78 वर्ग सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर पूर्ण पैसे मिळतील. पण नोट 39 वर्ग सेंटीमीटर असेल तर अर्धीच रक्कम मिळेल.

जर तुमच्याकडे 5, 10, 20 अथवा 50 रुपयांच्या फटक्या नोटा असतील. तर या नोटांचा अर्धा हिस्सा तरी असणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर तुम्ही नोट बदलू शकत नाही. जर फाटक्या नोटांची संख्या 20 हून अधिक असतील आणि त्यांचे मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा अधिका असेल तर तुम्हाला या नोटा बदलण्यासाठी काही शुल्क जमा करावे लागेल.

जर तुमच्याकडे नोटांचे अनेक तुकडे असतील तर त्यांना ही नोट बदलता येतात. अर्थात या नोटा बदलण्याची प्रक्रिया थोडी कठिण आहे. या नोटांना रिझर्व्ह बँककडे पोस्टामार्फत पाठवू शकता. त्यासोबत तुमचे बँक खाते क्रमांक, खात्याचे नाव, IFSC कोडची माहिती द्यावी लागेल.