AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही तासांत मिळवू शकता पीएफ खात्यातून 1 लाख रुपये; केवळ या परिस्थितीत मिळणार अ‍ॅडव्हान्स रक्कम

आता कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यास सदस्यांना त्वरित 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम घेता येईल. (You can get Rs 1 lakh from PF account in a few hours; Advance amount will be given only in this case)

काही तासांत मिळवू शकता पीएफ खात्यातून 1 लाख रुपये; केवळ या परिस्थितीत मिळणार अ‍ॅडव्हान्स रक्कम
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:29 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना काळात नोकरी-व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटात सध्या नोकरदारांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमध्ये जमा असलेल्या पैशांचा मोठा आधार मिळाला आहे. मुळात नेहमीच पगारदार लोकांसाठी पीएफ खाते खूप उपयुक्त असते. नोकरदार लोक केवळ त्यात गुंतवणूक करत नाहीत तर आवश्यक असल्यास पैसे काढून घेऊ शकतात. पूर्वी ईपीएफओकडून लग्न, मुलांचे शिक्षण किंवा मेडिकलसाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा पर्याय दिला जायचा. परंतु, आता ईपीएफओकडून अनेक कारणांसाठी पैसे काढता येऊ शकतात. अलीकडेच ईपीएफओने खातेदारांना एक सुविधा दिली आहे, त्यानुसार आता कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यास सदस्यांना त्वरित 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम घेता येईल. (You can get Rs 1 lakh from PF account in a few hours; Advance amount will be given only in this case)

विशेष बाब म्हणजे यासाठी कोणत्याही गॅरेंटीची अर्थात हमीची आवश्यकता राहणार नाही. ईपीएफओने अलिकडेच म्हणजेच 1 जून रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्या परिपत्रकात म्हटले आहे की कोविड -19 सारखा कुठला गंभीर आजार झाल्यास म्हणजेच जिवाला धोका निर्माण करणाऱ्या आजारासाठी पगारादार व्यक्तीला 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मेडिकल अ‍ॅडव्हान्सच्या रुपात दिली जाणार आहे.

मेडिकल अ‍ॅडव्हान्स कोण घेऊ शकेल?

याआधी ईपीएफओने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी ईपीएफ खात्यातून आगाऊ रक्कम घेण्यास परवानगी दिली होती. ही रक्कम केवळ वैद्यकीय खर्चाच्या अंदाजाच्या आधारे किंवा वैद्यकीय बिले भरपाईसाठी मिळू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतेही बिल किंवा कॉस्ट प्रोजेक्शन सादर करण्याची आवश्यकता नाही. फक्त एका अर्जाद्वारे तुम्हाला 1 लाख रुपये मिळू शकतात आणि जर तुम्ही रुग्णालयात दाखल असाल तर कोणीही हे काम करू शकेल.

किती दिवसात पैसे मिळतील?

ज्या व्यक्तीचे पीएफ खाते आहे, ती व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सदस्य किंवा कुटुंबियांच्या वतीने अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर काही तासांतच पैसे मिळतात. जर आठवड्यातील कुठलाही कामकाजाचा दिवस असेल तर त्याच दिवशी रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे मिळतात. वास्तविक, बऱ्याच वेळा लोकांना कोणत्याही परिस्थितीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागते आणि अशावेळी हे पैसे खूप उपयुक्त ठरतात. हा निर्णय गेल्या महिन्यात ईपीएफओ बोर्डाने मंजुरी कोविड अ‍ॅडव्हान्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

तुम्हाला हे पैसे कसे मिळतील?

या पैशांसाठी खातेधारकास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. 1 लाख रुपयांच्या अ‍ॅडव्हान्स रक्कमेवर दावा करण्यासाठी खातेधारक व्यक्तीला सरकारी किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत अंतर्भूत असलेल्या रूग्णालयात दाखल कलेले असावे. खासगी रुग्णालयात दाखल केलेले असल्यास काही तपासणी केली जाते आणि त्या तपासणीनंतर पैसे मिळतात. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना एक विनंती पत्र द्यावे लागेल. त्या पत्रात बेड नंबर, प्रिस्क्रिप्शन यासारखी माहिती द्यावी लागेल. यामध्ये अंदाजित रक्कमेविषयी माहिती द्यावी लागत नाही. हे पैसे मिळविण्यासाठी आपल्याला दीर्घ आणि किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागत नाही. (You can get Rs 1 lakh from PF account in a few hours; Advance amount will be given only in this case)

इतर बातम्या

आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा, अन्यथा होईल डोकेदुखी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांच्या नावे सुसाईड नोट, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शेतात गळफास

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.