100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 02 October 2021
राजकारणातील पारंपारिक कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शनिवारी नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि शरद पवारही एकच मंचावर येणार असल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चांना उधाण आलं आहे.
राजकारणातील पारंपारिक कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शनिवारी नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि शरद पवारही एकच मंचावर येणार असल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय भेद विसरुन पवार-विखे-गडकरी विकासकामांसाठी एकाच मंचावर येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार आहे. आज 10.45 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकडे नगरचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

