100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 September 2021

परतीचा पाऊस संकट म्हणून येईल, असं मराठवाड्याला वाटलं नव्हतं. पण गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलीय. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय.

परतीचा पाऊस संकट म्हणून येईल, असं मराठवाड्याला वाटलं नव्हतं. पण गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलीय. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची अशीच आवक सुरु राहिली तर अवघ्या काही तासांत मराठवाडा धरण 100 टक्के भरणार आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. भरीस भर म्हणजे आजही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेलीत. मराठवाड्यातील तब्बल 7 लाख शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. 25 लाख हेक्टरवर जवळपास 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय. शेतीला अक्षरश: तळ्याचं स्वरुप आलंय. शेतातील पाण्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI