AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुनी पेन्शन योजना लागू करा, 'या' दिवसापासून १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर

जुनी पेन्शन योजना लागू करा, ‘या’ दिवसापासून १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Mar 13, 2023 | 5:28 PM
Share

VIDEO | जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तब्बल १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर, राज्य सरकार कोणती पाऊलं उचलणार?

मुंबई : राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प होणार आहेत. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार आणि आंदोलक कर्मचारी यांच्यात आज बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतरही कर्मचारी आपल्या बेमुदत संपाच्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत तर सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात जरी आले असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

Published on: Mar 13, 2023 05:28 PM
Follow Us