AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणांवर पुन्हा छापे

Special Report | संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणांवर पुन्हा छापे

| Updated on: Aug 03, 2022 | 12:13 AM
Share

राऊतांना अटक केल्यानंतर राऊत यांच्याशी संबंधितांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. या लोकांची पुन्हा चौकशी करून आणखी महत्त्वाची माहिती घेतली जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणातल्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनाही कधीही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. त्यामुळं राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे

मुंबई : संजय राऊत(Sanjay Raut) यांच्याशी संबंधित 2 ठिकाणांवर आज ईडीनं पुन्हा छापेमारी केलीय़. त्यामुळं संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीनं छापेमारी केलेली 2 ठिकाणं कुठली आहेत याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त ठेवलीय. ईडीनं याआधी राऊतांच्या भांडूपमधल्या मैत्री बंगल्यावर छापे मारले होते. त्याच दिवशी दादरच्या गार्डन कोर्ट इमारतीतल्या राऊतांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. गोरेगावमध्येही ईडीनं सर्च ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर राऊतांची तब्बल 16 तास चौकशी झाली होती. या चौकशीनंतरच राऊतांना अटक करण्यात आली होती. राऊतांना अटक केल्यानंतर राऊत यांच्याशी संबंधितांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. या लोकांची पुन्हा चौकशी करून आणखी महत्त्वाची माहिती घेतली जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणातल्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनाही कधीही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. त्यामुळं राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज राज्यसभेतही उमटले. राऊतांच्या अटकेवर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.या मुद्दयावरुन जोरदार गदारोळही झाला. संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. राऊतांच्या अटकेनंतर आज मातोश्रीवर शेकडो शिवसैनिक एकवटले होते. 3 दिवसांची ईडी कोठडी संपल्यानंतर राऊतांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यानंतर न्यायालय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ करणार की न्यायालयीन कोठडीत सुनावणार हेच पाहावं लागेल.

Published on: Aug 03, 2022 12:13 AM