36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 11 October 2021

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास सर्व प्रमुख नेते आज रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. संध्याकाळच्या सुमारास हा बंद संपला. त्यानंतर काही ठिकाणी दुकाने उडल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकानं बंद ठेवणंच पसंत केलं आहे. 

दरम्यान, मुंबईसह राज्यात अनेक भागात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा केलाय. आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेनं प्रतिसाद दिला. भाजपनं बंदला विरोध केला. भाजप शेतकऱ्यांच्या हत्तेचं समर्थन करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेते रस्त्यावर आले नाहीत म्हणून त्यांना बंद कळाला नसेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI