36 जिल्हे 50 बातम्या | 17 October 2021
विखे आणि पवार कुटुंबामधील राजकीय सुंदोपसुंदी, दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीतील वैमनस्य, त्याचे काहीच महिन्यापूर्वी उमटलेले पडसाद या गोष्टी महाराष्ट्राला परिचित आहेत. पण विखे पवारांची आताची पिढी मॉडर्न आहे. विचारांनी प्रगल्भ आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे विखे-पवारांमधील राजकारणापलीकडची मैत्री…!
विखे आणि पवार कुटुंबामधील राजकीय सुंदोपसुंदी, दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीतील वैमनस्य, त्याचे काहीच महिन्यापूर्वी उमटलेले पडसाद या गोष्टी महाराष्ट्राला परिचित आहेत. पण विखे पवारांची आताची पिढी मॉडर्न आहे. विचारांनी प्रगल्भ आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे विखे-पवारांमधील राजकारणापलीकडची मैत्री…! काल नगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आणि इम्प्रेस झालेल्या सुजय विखेंनी तो फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला.
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची काल औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. सुजय विखे आणि पार्थ पवारांनी एकाच विमानाने प्रवासही केला. औरंगाबाद ते मुंबई असा त्यांचा प्रवास होता.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

