36 जिल्हे 72 बातम्या | 11 September 2021
राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. मात्र, या जागेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून लॉबिंग सुरु असल्याने अद्याप प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

राज्यसभेच्या या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे इच्छूक आहेत. तर मुंबईतील काँग्रसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्याकडूनही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु आहे. त्यामुळे आता हायकमांड कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट