4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 02 October 2021
मराठवाडा, विदर्भात ओल्या दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. सरकार वरातीमागून घोडे पळवत आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. आजपासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत.
“ओल्या दुष्काळामुळे विदर्भ – मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे” असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. आजपासून देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर ओल्या दुष्काळाचा पाहणी दौरा करत आहेत. नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, असं देवेंद्र फडणवीस ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले.
मराठवाडा, विदर्भात ओल्या दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. सरकार वरातीमागून घोडे पळवत आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. आजपासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज