Headline | 9 AM | परमबीर सिंगांच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी

नवी मुंबईतही पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री नवी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. | Rain in Navi Mumbai

नवी मुंबईतही पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री नवी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजपासून पुढील पाच दिवस कोकणासाठी हवामान खात्याने कोकण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, याठिकाणी सध्या पूर्णपणे उलटे चित्र पाहायला मिळत आहे.