4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 July 2021

भारतीय हवामान विभागानं कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या वतीनं प्रामुख्यानं कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अ‌ॅलर्ट आणि ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याचेवळी राज्याच्या इतर भागात तुरळक पावासाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, 19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI