VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 26 May 2022
ईडीने सकाळपासून अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सात ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज छापेमारीनंतर काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे. छापेमारीला सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला.
ईडीने सकाळपासून अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सात ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज छापेमारीनंतर काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे. छापेमारीला सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. “अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, तसेच ते कडवट शिवसैनिक देखील आहेत. सध्याची जी कारवाई सुरू आहे, ती राजकीय सूडबुद्धीनं सुरु आहे. ज्याप्रकारचे आरोप ईडीकडून लावले जात आहेत, त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हा भाजपच्या लोकांवर आहेत, पण त्यांना कुणी हात लावत नाही. आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

