VIDEO : Headline | 10 AM | विनायक मेटेच्या नेतृत्वात आज निघणार बाईक रॅली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनलं. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण अजून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनलं. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण अजून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. मात्र, एका अभ्यानुसार तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी धोकदायक असणार आहे असं  ICMR म्हटंले आहे. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे.

दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल. साधारणत: कोणत्याही साथीच्या रोगाची दुसरी लाट ही पहिल्याच्या तुलनेत दुबळी असते. कारण तोपर्यंत लोकांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI