4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 23 July 2021

पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले.

पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले. राज्यातील विविध घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 71 जणांचा मृत्यू झालाय. यात चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटर, महाडमधील तळीये, साताऱ्यातील आंबेघर, रायगडमधील पोलादपूर आणि साताऱ्यातील वाईचा येथील घटनांचा समावेश आहे.

कुठे किती मृत्यू?

  • चिपळून – अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर – 8 रुग्णांचा मृत्यू
  • तळीये, महाड – आतापर्यंत 38 मृत्यू
  • आंबेघर, सातारा – 12 जणांचा मृत्यू
  • पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
  • वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
  • एकूण मृत्यू – 71

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI