50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 7 September 2021
कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने मात्र मलिक यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. काही आयपीएस, आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान आहे, त्यांच्या भेटी आम्ही वेळोवेळी उघड करू. केंद्रीय नेते आणि फडणवीसांना भेटून हे अधिकारी आरोप करतात, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन

