Corona | कोरोनात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत,केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

नुकसानभरपाईची रक्कम ठरवण्यासाठी तसेच नियमावली बनवण्यासाठी केंद्र सरकारने चालढकल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्राने आज बाजू मांडली. मात्र भरपाईची रक्कम देण्याची जबाबदार राज्यांवरच ढकलली आहे.

नवी दिल्ली : कोरोना मृत्यूसाठी 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. नुकसानभरपाईची रक्कम ठरवण्यासाठी तसेच नियमावली बनवण्यासाठी केंद्र सरकारने चालढकल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्राने आज बाजू मांडली. मात्र भरपाईची रक्कम देण्याची जबाबदार राज्यांवरच ढकलली आहे. कोरोना मृत्यूसाठी राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे भरपाईची रक्कम दिली जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोना बळींच्या कुटुंबियांना 4 लाखांची भरपाई देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आता एनडीएमएने तयार केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांवर नाराजीचा सूरही आळवला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना 50,000 रुपये अनुग्रह रक्कम दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंसाठी एक्स-ग्रेशिया रकमेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एनडीएमएने राज्य आपत्ती निवारण निधीतून राज्यांना 50 हजार रुपये निर्धारीत केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI